Press "Enter" to skip to content

महावितरण भरती विरोधात मराठा क्रांती मोर्चा आक्रमक

एक डिसेंबरला पेण महावितरण विभागिय कार्यालयावर कार्यकर्ते देणार धडक 🔷🔶🔶🔷

सिटी बेल लाइव्ह । खालापूर । मनोज कळमकर । 🔶🔶🔷🔷

मराठा समाजाला महावितरण भरतीत ङावलले जात असल्याच्या भावनेतून मराठा क्रांती मोर्चा आक्रमक झाला असून मंगळवारी एक ङिसेंबरला पेण महावितरण विभागिय कार्यालयावर कार्यकर्ते धङक देणार आहेत.

29 नोव्हेंबरला  मराठा क्रांती मोर्चा ची पुणे येथे राज्य स्तरीय बैठक पार पङली होती.   महावितरण विभागाकङून  भरतीत  मराठा समाजाच्या मुलाना वगळण्यात आल्याचा निषेध म्हणून मंगळवारी रायगड जिल्ह्यातील पेण विभागिय  महावितरण कार्यालयात होणारी   उमेदवारांची कागदपत्र पडताळणीला विरोध करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

मंगळवारी एक डिसेंबरला सकाळी साङेदहा वाजता मराठा क्रांती मोर्चा रायगड जिल्ह्याच्या वतीने पेण येथील महावितरण कार्यलय येथे एकञ येणार आहोत. मराठा समाजावर होणारा अन्याया विरोधात भरती प्रक्रिया होवू देणार नाही.

विनोद साबळे-  समन्वयक मराठा क्रांती मोर्चा रायगड

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.