Press "Enter" to skip to content

कोरोना व थंडीच्या काळात जपली सामाजिक बांधिलकी

आदिमाया आदिशक्ती चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने अनाथ, मनोरूग्ण, निराधारांना पांघरली मायेची चादर 🔷🔶🔶🔷

सिटी बेल लाइव्ह । पाली । धम्मशील सावंत । 🔷🔷🔶🔶

आदिमाया आदिशक्ती चॅरिटेबल ट्रस्ट (रजिस्टर) मुंबईच्या वतीने कोरोना सारख्या महामारीत गेले दहा महिने सामाजिक बांधिलकी जपताना दिसत आहे. गरीब गरजूंना अन्न धान्याचे वाटप केलेच तसेच सॅनिटायझर, कोरोना कीट ,असे स्तुत्य उपक्रम राबवून आता कडाक्याच्या थंडीत ट्रस्टचे प्रमुख सल्लागार समाजसेवक चंद्रकांत पांडुरंग अडसुळे यांच्या मार्गदर्शनाखाली ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष आकाश उत्तम कांबळे व संचालिका जयश्री आकाश कांबळे यांनी मुंबईतील घाटकोपर,चेंबूर,कुर्ला आणि नवीमुंबईतील वाशी या ठिकाणी अनाथ,गरजू,मनोरूग्ण,निराधार रस्त्यावरचे फिरीस्ती यांना उबदार कपडे व अल्पोपहाराचे वाटप नुकतेच केले.

या प्रसंगी संस्थापक अध्यक्ष आकाश कांबळे यांनी सांगितले की आमची संस्था समाजातील अनाथ शोषित वंचित घटकांसाठी कामं करित असून भविष्यात मुंबईत, नवीमुंबईत अनाथांसाठी निवारा उभरणार असून अनेकांना आधार देणार असे त्यांनी सांगितले.

सध्या गरिब अनाथ निराधार आपले जीवन भयंकर परिस्थिती जगत आहेत. यांना आधार देऊन त्यांना समाजाच्या मुळ प्रवाहात आणण्यासाठी खारीचा वाटा म्हणून आदिमाया आदिशक्ती चॅरिटेबल ट्रस्ट दिवस रात्र मेहनत घेत आहे.असे ते शेवटी म्हणाले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.