वाहनचालकासह लाखोंचा माल हस्तगत : तीन जणांवर गुन्हे दाखल 🔷🔶🔷🔶
रोहा वनविभाग संरक्षण व अतिक्रमण निर्मुलन पथकाची कामगिरी 🔶🔷🔷🔶
सिटी बेल लाइव्ह । समीर बामुगडे । रोहा । 🔶🔶🔷🔷
महामार्गावर पुगांव नजीक रोहा वनविभागाच्या वनक्षेत्रपाल संरक्षण व अतिक्रमण निर्मुलन पथकाने बेकायदेशीर विनापरवाना बिनदिक्कतपणे खैर सोलिव लाकडाची वाहतूक करणारा टेम्पो मुद्दे मालासह पकडून वाहनचालकासह तीन जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर विनापरवाना बेकायदेशीर खैर सोलिव लाकडाची वाहतूक होत असल्याची खबर रोहा वनविभागाच्या संरक्षण व अतिक्रमण निर्मुलन पथकाला लागली होती. या पथकाने सापळा रचून मुंबई-गोवा महामार्गावर पुगांव येथे टाटा ११०९ एम. एच.-०४ डी.के.२३८८ पकडून सदर वाहनामध्ये वाहतूक होत असलेला खैर सोलिव नग ४०६ किंमत रुपये १०२५६१/-.व टेम्पो किंमत रुपये १००००००/-.मुद्दे मालासह जप्त करण्यात आला असून आरोपी १) शमसुल हसन खान (वाहनचालक) रा.माहिम पूर्व,२)जावेद शेख (मालक)रा.डहाणू रोड, पालघर ३)तय्यब अशा तीन जणांवर भारतीय वनविभाग अधिनियमन १९२७ चे कलम २६(१) फ,४१(२ब),४२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून वनविभाग संरक्षण व अतिक्रमण निर्मुलन रोहाचे इच्छात कांबळी, फिरते पथक वनरक्षक आर.जी.पाटील,भगत, देवकांबळे, मुळे, वनपाल मंगेश शेळके हे करीत आहेत. याकामी तपासणी नाका वनरक्षक पव्हेरे, राजमाने व वाहनचालक लोखंडे यांचे सहकार्य लाभले.








Be First to Comment