खेडेगावातील विद्यार्थी रानफुले असतात,पठारावर देखील फुलतात :
प्रांताधिकारी अमित शेडगे 🔷🔶🔷🔶
सिटी बेल लाइव्ह । श्रीवर्धन । केतन माळवदे । 🔶🔶🔷🔷
पंचक्रोशी विकास मंडळ वाळवटी च्या विद्यमाने किसान हायस्कुल वाळवटी येथे मंडळाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या दिनदर्शिकेचे उद्घाटन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून मनोगत व्यक्त करताना श्रीवर्धन चे प्रांताधिकारी म्हणाले की ,खेडेगावातील विद्यार्थी रानफुले असतात.पठारावर देखील फुलतात ती सुशिक्षित असून सुसंस्कारित असतात.
या वेळी व्यासपीठावर श्रीवर्धनचे नगराध्यक्ष जितेंद्र सातनाक ,श्रीवर्धन तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अनिल भुसाणे ,सा .गटविकास अधिकारी बाळासाहेब भोगे ,संजय मोरे माजी जी प सदस्य अविनाश कोळंबेकर, प्रित्तम शेट्ये ,चिराग गांधी ,वैभव शेट्ये ,वाळवटी सरपंच सौ घरटकर , लाईकअली सोंडे आदिमान्यवर उपस्थित होते .
मनोगतात शेडगे यांनी बोलताना सांगितले की ,मंडळाचे कार्य अतिशय चांगले आहे.मंडळाने तळागाळापर्यंत पोहोचण्याचा कार्य केले आहे.मुलांसाठी पास योजना,बस सेवा नसणाऱ्या विद्यार्थ्यासाठी रिक्षा व्यवस्था,दत्तक योजना,विद्यार्थ्यांना मार्गदर्शन इ बाबत करत असलेल्या योजनांचे कौतुकास्पद आहे .शासकीय पातळीवर जी मदत लागेल ती करणार असल्याचे सांगून मंडळाने असेच कार्य करावे अशा शुभेच्छा दिल्या.
यावेळी सायली संतोष बांद्रे – विद्यार्थिनी , राजेश तोडणकर-आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त,अविनाश कोळंबेकर- माजी जि. प.सदस्य,श्जितेंद्र सातनाक- नगराध्यक्ष श्रीवर्धन नगर परिषद , बाळासाहेब भोगे सहाय्यक गटविकास अधिकारी श्रीवर्धन,अनिल भुसाणे- अध्यक्ष श्रीवर्धन तालुका शिक्षण प्रसारक व सहाय्यक मंडळ-श्रीवर्धन यांनी मनोगत व्यक्त केले .
कार्यक्रमात दीपप्रज्वलन – मा. श्री.अमित शेडगे- उपविभागीय अधिकारी श्रीवर्धन यांचे हस्ते झाले तर सरस्वती पूजन मा श्री.जितेंद्र सातनाक- नगराध्यक्ष श्रीवर्धन नगर परिषद यांनी केले तर श्रीफळ वाढवून श्री.अनिल भुसाणे- अध्यक्ष श्रीवर्धन तालुका शिक्षण प्रसारक व सहाय्यक मंडळ,श्रीवर्धन यांनी केले. कार्यक्रम श्री.संजय मोरे -कार्याध्यक्ष पंचक्रोशी विकास मंडळ ,वाळवटी यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाले.
दिनदर्शिका प्रकाशन कार्यक्रमाचे औचित्य साधून सन 2019-20 मध्ये झालेल्या माध्यमिक शालांत परीक्षेत प्रथम पाच क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना भेट वस्तू देऊन गौरव करण्यात आले.विज्ञान सप्ताहात तालुकास्तरावर प्राविण्य प्राप्त तीन विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
रायगड जिल्हा परिषद, अलिबाग कडून सन २०१९-२० मध्ये जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त श्री.राजेश चंद्रकांत तोडणकर ( प्राथमिक) व श्री.समीर हिरामण वळवटकर (माध्यमिक) यांचा पंचक्रोशी विकास मंडळाच्या वतीने शाल,श्रीफळ, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
पंचक्रोशी विकास मंडळाच्या वतीने किसान हायस्कूल वाळवटी ची 105 विद्यार्थी दत्तक घेतले असून त्यातील 15 विद्यार्थ्यांना कार्यक्रमात दप्तर, रजिस्टर, गणवेश,कंपास इ.वस्तू देऊन सहकार्य करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक समीर वळवटकर सचिव पंचक्रोशी विकास मंडळ यांनी केले.तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भिकू पांगारकर यांनी केले .








Be First to Comment