Press "Enter" to skip to content

मनोहरशेठ भोईर यांच्या माध्यमातून न्हावा शिवडी मच्छिमार बांधवांना मिळणार नुकसान भरपाई

शिवसेना जिल्हा प्रमुख माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांची एमएमआरडीए व L&T च्या व्यवस्थापकांसोबत बैठक 🔶🔷🔷🔶

सिटी बेल लाइव्ह । उरण । सुनिल ठाकुर । 🔶🔶🔷🔷

आज शिवसेना जिल्हाप्रमुख मा. आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या माध्यमातून न्हावा शिवडी मच्छिमार बांधवांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी म्हणून एमएमआरडीए च्या अधिकाऱ्यांसोबत व ब्रिजचे काम चालू असलेल्या ठिकाणी स्थानिकांना प्राधान्य देण्यासाठी टाटा आणि L&T च्या व्यवस्थापक यांच्या सोबत बैठक झाली.

यावेळी लवकरात लवकर याच्यावर निर्णय घेण्यात यावा अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल असे जिल्हाप्रमुख मा. आमदार मनोहर शेठ भोईर यांनी ठणकावून सांगितले,
या बैठकीस तालुका संघटक मर्फी क्रियाडो, युवासेना तालुका अधिकारी गौरव म्हात्रे, शहर प्रमुख मनोज घरत, विभाग प्रमुख व शाखाप्रमुख आदी सह कार्यकर्ते उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.