सवादची तालुक्यातील पहिली जत्रा मात्र रद्द 🔷🔷🔶🔶
सिटी बेल लाइव्ह । पोलादपूर । शैलेश पालकर । 🔶🔷🔷🔶
कोरोना संसर्ग पार्श्वभूमीवर लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर मंदिरे खुली होऊन पोलादपूर शहरातील सिध्देश्वर शंकर मंदिरामध्ये प्रथमच त्रिपुरारी पौर्णिमेचा उत्सव मोठया उत्साहात साजरा झाला. मात्र, तालुक्यातील सवाद येथील श्रीमहाबळेश्वर शंकरमंदिराची तालुक्यातील पहिली यात्रा मात्र कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेच्या शक्यतेने रद्द करण्यात आली.
पोलादपूर शहरातील सिध्देश्वर आळीमध्ये श्रीसिध्देश्वर शंकरमंदिरामध्ये सकाळी सौ.ॠतुजा व रंजेश पवार या पोलीस दांपत्याने श्रीसत्यनारायणाच्या पुजेचा मान स्विकारून यथायोग्य विधीवत पुजा केली. सायंकाळी त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दीपोत्सव आणि त्रिपुरा प्रज्वलन तसेच महाआरतीचे आयोजन करण्यात आले. यावेळी शैलेश पालकर, राजन पाटणकर, अशोक गायकवाड, धर्मेंद्र प्रजापती यांनी शिव महाआरती केली. यावेळी नगराध्यक्ष राजन पवार, स्थानिक ज्येष्ठ ग्रामस्थ विजय ग.पवार, स्विकृत नगरसेवक राजन ब. पाटणकर, ज्येष्ठ पत्रकार शैलेश पालकर, शिवभक्त अशोक गायकवाड, संदीप गांधी, मंगेश नगरकर, धर्मेंद्र प्रजापती, सिध्देश पवार, चेतन पवार, श्रावणी शहा, वैशाली पवार, माजी नगराध्यक्षा अश्विनी गांधी, उज्ज्वला जयंत मराठे शेठ, तनुजा भागवत, कालिका अधिकारी तसेच नायडू परिवार यांच्यासह असंख्य शिवभक्तांनी उपस्थित राहून सोहळा भक्तीभावाने पार पाडला. त्रिपुरा प्रज्वलन आणि दीपोत्सवानंतर रात्री भजन किर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
दुसरीकडे पोलादपूर तालुक्यातील पहिली यात्रा अशी ख्याती असलेल्या सवाद येथील श्रीमहाबळेश्वर शंकर मंदिरामध्ये कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेच्या शक्यतेने यात्रा रद्द करण्यात आली आणि त्रिपुरा प्रज्वलन सोहळयावर निर्बंध लावण्यात आले. अतिशय कमी उपस्थितीत त्रिपुरा प्रज्वलनाचा सोहळा पार पडला. मात्र, सप्तक्रोशीतील तसेच पोलादपूर तालुक्यातील काही शिवभक्तांनी या मंदिरात सोशल डिस्टंन्सिंग आणि मास्क लावून दर्शन घेतले.








Be First to Comment