Press "Enter" to skip to content

संपर्क बालग्राम बांधण येथे संविधान दिन साजरा

सिटी बेल लाइव्ह । अलिबाग । आदित्य कडू । 🔶🔶🔷🔷

अलिबाग तालुक्यातील बांधण येथील संपर्क बालग्राम या संस्थेत २६ नोव्हेंबर रोजी मुंबई दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या वीर जवानांना आदरांजली अर्पण करण्यात आली.  तसेच हुंडा प्रतिबंधक दिवस साजरा करण्यात आला. या दोन्ही दिनविशेषांबद्दल संपर्क बालग्राम मधील मुलांना या दोन्हींविषयी सविस्तर माहिती ंसंस्थेच्या वतीने देण्यात आली. 

२६ नोव्हेंबर हा दिवस सर्वत्र संविधान दिन म्हणून साजरा करण्यात येतो. संपर्क बालग्राम या संस्थेत बालग्रामच्या अधीक्षका रेखा मोकाशी आणि सामाजिक कार्यकर्त्या निकिता भंडारे यांनी संविधान दिनाचे आयोजन केले होते.

या कार्यक्रमात बालसमितीच्या मुलांनीही विशेष सहभाग नोंदवला. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून सर्व मुलांनी भारतीय संविधानाचे वाचन केले. रेखा मोकाशी आणि निकिता भंडारे यांनी भारतीय संविधानाचे महत्व सर्व मुलांना सांगून भारतीय राज्यघटनेतील काही महत्वाच्या कलमांचे देखील वाचन करण्यात आले. राष्ट्रगीताने या संपर्क बालग्राममधील संविधान दिन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.