सिटी बेल लाइव्ह । कर्जत । संजय गायकवाड । 🔷🔶🔷🔶
कर्जत तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ कर्जत यांच्यावतीने शासकीय आधारभूत किंमत हमीभाव योजने अंतर्गत महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड यांच्यावतीने आधारभूत भात खरेदी केंद्राचे उदघाटन करण्यात आले.
दहिवली येथील कर्जत तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाच्या वतीने आधारभूत किंमत भात खरेदी केंद्राचे उद्घाटन माजी आमदार सुरेश लाड यांच्या हस्ते संपन्न झाले. खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष परशुराम घारे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आले. मधुकर घारे यांचे भात सर्वप्रथम खरेदी करून भात खरेदीचा शुभारंभ करण्यात आला.
याप्रसंगी उपाध्यक्ष विष्णू कालेकर, शरद लाड, दत्तात्रय भोईर, हरेश घुडे, यशवंत जाधव, धनंजय चाचड, हरेश घुडे, रमेश सांगळे, नाथा धुळे, सखाराम रोकडे, कर्जत भात गिरणीचे अध्यक्ष जयवंत देशमुख, माजी सभापती तानाजी चव्हाण, सहकार अध्यक्ष सीताराम मंडावळे, बळीराम देशमुख, विलास देशमुख, संभाजी श्रीखंडे, सुरेश हजारे, समीर देशमुख, गजानन भोईर उपस्थित होते.
माजी आमदार लाड यांनी, ‘यंदा आधारभूत भात खरेदी केंद्र वेळेवर सुरू झाले आहे. भात खरेदी करताना खरेदी विक्री संघाने शेतकऱ्यांना पूर्ण सहकार्य करा. तरीही शेतकऱ्यांनी केंद्रावर जास्तीत जास्त भात आणावे.’ असे आवाहन केले.
सुरुवातीला व्यवस्थापक केतन खडे यांनी सर्वांचे स्वागत केले. आधारभूत किंमत खरेदी योजने अंतर्गत आताचा भाताचा दर सर्वसाधारण 1868 रुपये प्रति क्विंटल अधिक 700 बोनस म्हणजे 2568 रुपये तर अ प्रतिच्या भातास 1888 रुपये प्रति क्विंटल अधिक 700 रुपये बोनस म्हणजे 2588 रुपये भाव मिळणार आहे, 700 रुपये बोनस शासनाच्या वतीने जाहीर झाले आहेत.’ अशी माहिती व्यवस्थापक खडे यांनी सांगितले.








Be First to Comment