खंडाळा घाटात घडला थरारक अपघात 🔷🔶🔷🔶
सिटी बेल लाइव्ह । खालापूर । मनोज कळमकर । 🔶🔶🔷🔷
खंडाळा घाटात ब्रेकफेल झाल्यामुळे कार 50 फूट दरीत कोसळल्याची घटना घङली असून सुदैवाने कार झाडाला अडकल्यामुळे कारमधील दिपेश बच्चनलाल-(वय 32-रा.नाशिक),राज कैलास गुप्ता-(वय.29-रा.मुंबई) व रोहित अनिल गुप्ता -(वय.29-रा.मुंबई)बचावले आहेत.
आज सकाळी दहाच्या सुमारास मुंबई-पुणे जुन्या महामार्गावरून वरून स्विफ्ट कार पुण्याच्या दिशेने निघाली होती.द्रूतगती मार्गावर दूधाचा टँकर पलटी झाल्यामुळे वाहतुक कोंडी झाल्याने अनेक वाहने खोपोलीच्या दिशेने वळविण्यात आली होती.गुप्ता याने देखील कार वळवून खंडाळा घाटातून परतत असताना ब्रेकफेल झाल्यामुळे कार अनियंञित झाली.

शिग्रोंबा मंदीराच्या वळणावर अनियंञित कार कठङा तोङून दरीत कोसळली. कार झाडाला अङकून बसल्याने मोठी दुर्घटना टळली.अपघाताची माहिती मिळताच खोपोली पोलिस,वाहतुक पोलिस,अपघातग्रस्तची पथक,ङेल्टा फोर्स घटनास्थळी मदतीला पोहचले. कारमध्ये अडकलेल्या तिघाना सुखरूप बाहेर काढण्यात आले.अपघातात कार मधील तिघेजण किरकोळ जखमी झाले असून जखमींना खोपोली नगर परिषदेच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
दरीत कोसळलेल्या कारचा चेंदामेंदा झाले असतानाही तरूण किरकोळ जखमी असल्याचे पाहून सर्वांनी अश्चर्य व्यक्त केले आहे.








Be First to Comment