
सिटी बेल लाइव्ह / उरण / रमेश थळी #
गेले आठवडा भर दररोज समाधनकारक पाऊस पडत असल्यामुळे उरण तालुक्यातील काही भागात भातशेती लावली जात आहे. उदाहरणार्थ नागांव,म्हातवली,केगाव भागात दमदार पाऊस पाऊस पडत असल्याने शेतात लावणी करीता मुबलक पाणी साठले असल्याने बळीराजा सुखावला आहे.
या वर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाचे आगमन झाले. मात्र या वर्षी केवळ आठ दिवस पाऊस पडला त्या नंतर २०दिवस दांडी मारली. आषाढी एकादशीपासून पुन्हा पाऊसाने हजेरी लावली. आज १५ दिवस चांगला पाऊस पाडल्याने बळीराजा सुखावला असून पावसाने उघडीप दिल्याने लावणीला सुरवात झाली आहे. पाऊस चांगला पाडल्याने काही भागात लावणी सुरू आहे तर काही भागात लावणीची कामे अंतिम टप्यात सुरु आहेत.






Be First to Comment