पाली तहसीलदारांना दिले मागणीचे निवेदन 🔶🔷🔶🔷
सिटी बेल लाइव्ह । पाली/बेणसे । धम्मशील सावंत । 🔷🔷🔶🔶
ओबीसींचे आरक्षण धोक्यात आणण्याचे कटकारस्थान उधळवून लावू असा इशारा देत ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण न देता इतर समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे अशी भूमिका अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेने स्पष्ट केली आहे. ओबीसी आरक्षण बचावासाठी पालीत समता परिषदेने नुकताच मोर्चा काढला. व पाली सुधागड तहसीलदार दिलीप रायन्नावार यांना मागणीचे निवेदन दिले.
महाराष्ट्रात ओबीसींचा मंडल आयोग १९९४ साली लागु होवुनही, पंचविस वर्षानंतरही ओबीसींच्या समस्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. ओबीसी विद्यार्थ्यांची तीन हजार कोटीची थकित शिष्यवृत्ती, ओबीसी विद्यार्थ्यांची वसतीगृहे, स्वाधार योजना,महाज्योतीला हजारो कोटीचा निधी हे विषय ऐरणीवर आहेत. अशातही ओबीसींचे आरक्षणच धोक्यात आणण्याचे कट कारस्थान सुरू केले असल्याचा आरोप करीत महाराष्ट्रात ओबीसी जनजागृती करून, तसेच सरकारला ईशारा देण्यासाठी महाराष्ट्रभर महात्मा फुले समता परीषदेच्या वतीने ओबीसी आरक्षण बचाव चे मोर्चे निघत आहे! रायगड जिल्हाध्यक्ष विक्रम परमार, महिला रायगड जिल्हाध्यक्ष संतोषी मोरे यांच्या नेतृत्वात पालीत ओबीसींचा मोर्चा काढण्यात आला!
मराठा समाजाच्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. मराठा समाजाला स्वतंत्रपणे आरक्षण मिळावे याचा ओबीसीं सह सर्वांचा पाठींबा आहे! ओबीसी आरक्षणाला धक्का लागल्यास ओबीसी समाजावर, विद्यार्थ्यांवर युवकांवर फार मोठा आघात होवुन अन्याय्य होईल ! शिक्षण नोकरी आणि स्थानिक स्वराज्य संस्थेतील निवडणुकीचे आरक्षण रद्द होईल !
याची जनजागृती करण्यासाठी व न्यायालयात राज्य सरकारने चांगले वकील देवुन, ओबीसींचे आरक्षण कायम राखण्यासाठी, तसेच मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करू नये ,यासाठी सरकारला ईशारा देण्यासाठी या मोर्च्याचे आयोजन करण्यात आले होते! छञपती शिवाजी महाराज स्मारकात महाराजांना पुष्पहार अर्पण करून या मोर्चाला प्रारंभ झाला, तर तहसिल कार्यालयात निवेदन देऊन मोर्चाचा समारोप करण्यात आला.

या ओबीसी आरक्षण बचाव मोर्च्यात महात्मा फुले समता परीषदेचे रायगड जिल्हाध्यक्ष विक्रम परमार, महिला रायगड जिल्हाध्यक्ष संतोषी मोरे, राजेंद्र गांधी, प्रकाश पालकर, संजय घोसाळकर,सुधीर साखरले, श्रीकांत ठोंबरे, दिनेश काटकर, अजय खंडागळे, तुषार म्हशीलकर, सचिन मोरे, उमेश मढवी, सागर ओसवाल, उत्तम ओसवाल, रवी खैरे, ओंकार बालके, स्वप्नील बालके, आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.








Be First to Comment