आदीवासी बांधवांना रोग प्रतिकारशक्ती वाढविणा-या गोळ्यांचे वाटप
सिटी बेल लाइव्ह / रसायनी–राकेश खराडे #
चौक वावर्ले येथील कानसा वारणा फाउंडेशनचे संस्थापक व शांतीदूत परिवाराचे सचिव दिपक पाटील यांच्यावतीने पर्यांवरण दिनानिमित्त शिलार विभागातील तीन आदीवासी वाड्यांत जांभूळ,सिताफल,आवला,बेल,पिंपल आदी पाचशेपेक्षा जास्त वृक्षांची लागवड करुन पर्यांवरणदिन साजरा करण्यात आला.तर आदीवासी बांधवांना अर्सेनिक अल्बम गोळ्यांचे वाटप करण्यात आले.
पर्यांवरण संतुलन राखण्यासाठी कानसा वारणा फाउंडेशन तसेच शांतीदूत परिवाराकडून वृक्षलागवड करण्यात येत असल्याचे दिपकदादा पाटील यांनी सांगितले.
देशासह राज्यात कोरोनाने हाहाकार माजल्याने सर्वत्र भितीचे वातावरण आहे.कोरोना आजाराचा संसर्गं आदीवासी बांधवांना होवू नये, त्यांची रोगप्रतिकारशक्ती चांगली राहावी यासाठी कानसा वारणा फाउंडेशनचे संस्थापक तसेच शांतीदूत परिवाराचे महाराष्ट्र सचिव दीपकदादा गणपत पाटील यांच्यावतीने राज्यात ठिकठिकाणी रक्तदान शिबिरासह सामाजिक उपक्रम सुरू आहेत.कोरोना पाश्र्वभूमीवर विविध जिल्ह्यांत नागरिकांच्या संरक्षणासाठी उपाययोजना राबविल्या जात आहेत.पर्यांवरणाचे संतुलन राखण्यासाठी दिपक पाटील यांच्याकडून शिलार विभागातील आदीवासी वाड्यांत विविध जातींच्या पाचशेपेक्षा जास्त वृक्षांची लागवड करुन तेथील आदीवासी बांधवांना अर्सेंनिक अल्बम गोळ्यांचे वाटप केले.यावेळी योगेश शेमटे, अनिल शेमटे,दिलिप ताम्हाणे,लक्ष्मण सांबरी,सुरेश शेंडे, जनार्दन भगत,कालूराम पादीर, रघुनाथ शेंडे, अंकुश उघडा,विजय आहेर,चंद्रकांत पारधी,बालू भगत,सारीका पादिर, नामदेव पादीर,चांगीबाईं सांबरी आदी उपस्थित होते.यावेळी दिपकदादा पाटील यांनी आदीवासी बांधवांना सोशल डिस्टिंक्शनचे पालन करुन काळजी घेण्याचे आवाहन केले.






Be First to Comment