Press "Enter" to skip to content

प्रिझम जॉन्सन कंपनी विरोधात कामगारांचा एल्गार

प्रिझम जॉन्सन कंपनीने कामगारांवर केलेल्या अन्याया विरोधात वाचा फोडुन न्याय दिला जाईल : हिराजी पाटिल

🔶🔷🔶🔷

सिटी बेल लाइव्ह । पेण । प्रशांत पोतदार ।

🔷🔷🔶🔶

कामगार विरोधी धोरणाच्या विरोधात कामगारांमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे.कामगार क्षेत्रात जागृती करुन प्रिझम जॉन्सन या कंपनीच्या व्यवस्थापनेने कामगारांवर अन्याय केलेला आहे या अन्याला वाचा फोडुन कामगारांना न्याय मिळवुन दिला जाईल असे रोखठोक वक्तव्य कामगार भारती माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन संस्थापक सरचिटणीस हिराजी पाटिल यांनी पेण येथे आयोजित केलेल्या मार्गदर्शन सभे प्रसंगी केले.

यावेळी संस्थापक सरचिटणीस हिराजी पाटील, जयेश पाटिल, विजय सुर्वे,दिनेश म्हात्रे ,संजय बांदिवडेकर,दिलिप म्हात्रे ,अजित साखरे,प्रेमनाथ पाटील, आदि तसेच प्रिझम जॉन्सन कंपनीचे अन्यायग्रस्त कामगार उपस्थित होते.

उपस्थित कामगार व पदाधिकारी यावेळी कामगार भारती संघटनेच्या सभे प्रसंगी चर्चा करण्यात आली तर यावेळी मार्गदर्शन करताना संघटना संस्थापक सहचिटणीस हिराजी पाटील यांनी सांगितले की, ही प्रिझम जॉन्सन कंपनी कामगारांना फसवत आहे पण कामगार भारती संघटना कामगारांच्या पाठी ठामपणे उभी आहे आणि हि संघटना पैशाने विकली जाणार नाही अन्यायाविरोधात लढा उभारुन न्याय दिला जाईल तुम्हचा विश्वास सार्थ ठरेल तुम्ही संघटित रहा.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.