Press "Enter" to skip to content

युवक राष्ट्रवादीच्या पेण सुधागड मतदार संघ निरीक्षकपदी विनय गोळे

सिटी बेल लाइव्ह । नागोठणे । महेश पवार । 🔷🔷🔶🔶

युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नागोठण्यातील युवा नेतृत्व व युवक राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस विनय गोळे यांनी युवकांना राष्ट्वादी पक्षात आकर्षित करून पक्ष संघटना मजबुतीकडे प्रामुख्याने लक्ष देऊन आमदार अनिकेत तटकरे यांनी केलेली निवड सार्थ ठरवली व ते विश्वासास पात्र ठरले. त्यामुळे खासदार सुनिल तटकरे यांच्या आशीर्वादाने, पालकमंत्री अदीती तटकरे व आमदार अनिकेत तटकरे यांच्या शिफारशीने विनय गोळे यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष सुरेश लाड, जिल्हा युवक निरीक्षक अजय बिरवाडकर व युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अंकित साखरे यांनी युवक राष्ट्रवादी पेण सुधागड मतदार संघाच्या निरीक्षकपदी निवड केली आहे. या निवडीमुळे विनय गोळे यांच्यावर सर्व स्तरांतुन अभिनंदननाचा वर्षाव होत आहे.

जिल्हा सरचिटणीस विनय गोळे यांनी नागोठणे विभाग राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातुन रक्तदान शिबिर, वृक्षारोपण कार्यक्रम, हैण्ड सँनिटायझर मशीनचे लोकार्पण त्याच बरोबर सरकारी दवाखाना येथे सँनिटाझर, मास्क, त्याच बरोबर फेसशिल्ड वाटप असे उपक्रम राबवुन नागोठणे विभागातील युवकांना पक्षात मोठ्या प्रमाणात सक्रीय करण्यात यशस्वी झालेले आहेत. विनय गोळे यांच्या या निवडीबद्दल सर्वत्र स्वागत व समाधान व्यक्त करण्यात आले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.