२६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना नागोठणे पोलिस ठाण्यात आदरांजली 🔷🔷🔶🔶
सिटी बेल लाइव्ह । नागोठणे । महेश पवार । 🔶🔷🔶🔷
ना जाती साठी ना पाती साठी, एक दिवस फक्त पोलिसांसाठी या उपक्रमांतर्गत महाराष्ट्र पोलिस बाॅईज संघटना व नागोठणे ग्रामस्थ यांच्या वतीने मुंबईवर झालेल्या २६/११ च्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सर्व वीरांना नागोठणे पोलिस ठाण्यात आदरांजली वाहण्यात आली.
नागोठणे पोलिस ठाण्याचे निरीक्षक दादासाहेब घुटूकडे यांचा यावेळी पुष्गुच्छ देवून व आज कर्तव्याचे असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना गुलाब पुष्प देवून ते करत असलेल्या कार्यासाठी गौरविण्यात आले. पोलिस हे आपल्या समाजातील खरे कोव्हीड योद्धे आहेत व या अशा भयाण परीस्थितीत कुठेही कमी न पडता ते सतत लोकसेवेसाठी तत्पर असतात यासाठी समाज त्यांचा सदैव ऋणी राहील यासाठी पोलिसांचा हा गौरव करण्यात आल्याचे महाराष्ट्र पोलिस बाॅईज संघटनेकडून स्पष्ट करण्यात आले.
नागोठणे पोलिस ठाण्यातील या शहिदांना आदरांजली व पोलिस गौरव कार्यक्रमासाठी महाराष्ट्र पोलिस बाॅईज संघटनेचे जिल्हाध्यक्ष मंदार चितळे,
ॲड. श्रीकांत रावकर, मराठा तरूण उद्योजक चेतन कामथे, मराठा तरूण उद्योजक पवन जगताप, वैभव कामथे, किरण गुरव आदींसह अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.








Be First to Comment