सिटी बेल लाइव्ह । खालापूर । विकी भालेराव । 🔶🔶🔷🔷
येथील राहणारी समिधा सुरेश गायकवाड हिच्या १४ व्या वाढदिवसानिमित्ताने खालापूर येथील गौरी हॉटेल येथे मोफत शिवभोजन थाळीचे वाटप करण्यात आले,यावेळी जवळपास १०० जणांनी या भोजनाचा आस्वाद घेतला.
वाढदिवसाची नवीन फॅड म्हणून बॅनर बाजी पोस्टर बाजी याचा ड्रेण्ड एकीकडे असताना खालापूर येथील सामाजिक कार्यकर्ते सुरेश गायकवाड व त्यांचा सुपुत्र साहिल गायकवाड यांनी इतरांपेक्षा आपण वेगळ काहीतरी कराव ही संकल्पना मनात ठरवून कु.समिधा हिच्या १४ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने खालापूर येथील गौरी हॉटेल येथे गोरगरीब व आदिवासी बांधवांना मोफत शिवभोजन थाळी वाटप करण्यात आली.
कु.समिधा गायकवाड ही मुळातच खूप हुशार व बुद्धीजीवी मुलगी आहे,जसे की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात या म्हणी प्रमाणे तिच्या आई वडिलांनी तिचे गुण लहानपणीच हेरले असावे,तिच्या दर वाढदिवसाला नेहमीच समाजपयोगी कार्य ते करीत असतात,तिच्या वाढदिवसा निमित्ताने तिला तालुक्यातील अनेक सामाजिक, धार्मिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.








Be First to Comment