Press "Enter" to skip to content

रसायनीकरांसाठी दिलादायक बातमी

वासांबे मोहोपाडा हद्दितील 83 जणांची कोरोनावर मात : एकूण रुग्णसंख्या 138

सिटी बेल लाइव्ह / रसायनी / राकेश खराडे #

कोरोना (कोविड-19)या विषाणूने जगभर थैमान घातल्याने सर्वंत्र हाहाकार माजला आहे.महाराष्ट्र राज्यातही कोरोना रुग्णांचा आलेख वाढताच आहे. कोरोना या विषाणुची सर्वंत्र भिती असली तरी नागरिक गंभीर दखल घेताना दिसत नसल्यानेच कोरोना रुग्णांची संख्या वाढतच असल्याचे दिसून येते. रसायनी परीसरातील वासांबे मोहोपाडा परीसरात कोरोनाने शिरकाव करुन भयभीत वातावरण निर्मिती केली आहे.
वासांबे मोहोपाडा हद्दीत कोरोनाचा फैलावर वाढून गुरुवारी नव्याने पाच जणांचे कोरोना अहवाल पाॅझिटीव्ह आले असून वासांबे मोहोपाडा हद्दीत एकूण 138 व्यक्ती कोरोनाने बाधित झाले आहेत.त्यातील आजपर्यंत जवलपास 83 जणांनी कोरोनावर मात करुन घरी सुखरूप परतले आहेत.गुरुवार दि.16 रोजी मोहोपाडा एक, नविन पोसरी एक, भटवाडी दोन,कालणवाडीनजीक रिस नविन वसाहत एक असे पाच जणांचे अहवाल पाॅझिटीव्ह आले आहेत.गेल्या दोन दिवसांपासून वासांबे मोहोपाडा हद्दितील कोरोना रुग्णसंख्येत घट होत असल्याचे पहावयास मिळत असून चालू लाॅकडाऊनच्या शेवटपर्यंत वासांबे मोहोपाडा हद्दित कोरोना हद्दपार होणार असल्याचे जाणकारांचे मत आहे.लाॅकडाऊनच्या पहिल्या दिवसाचा परीसराचा आढावा घेतला असता रसायनीकर लाॅकडाऊनचे तंतोतंत पालन करत असल्याचे दिसून आले.महिना अखेर कोरोना रसायनीसह वासांबे मोहोपाडा हद्दितून नेस्तनाबूत होईल यात तिलमात्र शंका नसल्याचे दिसून येत आहे.कोरोनाला घाबरून जाऊ नये,स्वता:ची रोगप्रतिकारशक्ती वाढवा,कोरोना आपोआप गायब होईल.यासाठी वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायत,चांभार्ली ,वावेघर व नजीकच्या ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व कर्मचारी, सर्वपक्षीय पदाधिकारी तसेच पोलिस यंत्रणा प्रयत्नशील आहे.
नागरिकांनी चालू असलेल्या लाॅकडाऊनचे काटेकोर पालन करुन स्व:ताची व कुटुंबाची काळजी घ्यावी असे आवाहन होत आहे.कोरोना हा गंभीर आजार नसून घाबरून जाऊ नये,आपणास आजाराची लक्षणे दिसत असतील तर त्वरीत डाॅक्टरांचा सल्ला घ्यावा.रसायनीकरांनो आतातरी सावध व्हा! विनाकारण घराबाहेर पडणे टाला,सोशल डिस्टसिंगचे तंतोतंत पालन करा असे आवाहन करुन हात जोडून विनंती करत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.