Press "Enter" to skip to content

विज बिलदरवाढी विरोधात मनसेचा पेणमध्ये जनआक्रोश मोर्चा

सिटी बेल लाइव्ह । रायगड । अमूलकुमार जैन । 🔶🔶🔷🔷

राज्य सरकारने जनतेची फसवणुककेली असुन विजबिलात वाढ करुन सामान्य जनतेची फसवणुक केली असुन या विजबिल दरवाढी विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पेण उपविभागिय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढुन विजबिल कमी करण्याची मागणी केली.

कोरोना काळात सामान्य जनतेचा रोजगार बुडाला अनेकाच्या नोक-या गेलेल्या असतानाच राज्यसरकारने वाढीव विजबिल आकारुन सामान्य जनतेची फसवणुक केली असुन विजबिल माफ करावे या मागणीसाठी छत्रपती शिवाजी चौक ते उपविभागिय अधिकारी कार्यालया पर्यत मोर्चा काढण्यात आला.

या मोर्चात संदिप ठाकुर मनसे व्यापारी सेना राज्य उपाध्यक्ष , सपना देशमूख मनसे महिला जिल्हाध्यक्ष,लता कळंबे मनसे जिल्हा सचिव,अंकुश म्हात्रे मनसे पेण तालुकाध्यक्ष,नागेश गांवड मनसे पेण तालुका सचिव, सुनिल साठे सुधागड तालुकाध्यक्ष,नितिन पाटील शहर अध्यक्ष,अनिशा गांवड पेण तालुका मनसे महिला सेना,रेखा तांडेल पेण तालुका सचिव मनसे महिला सेना,छाया शिंदे पेण शहर मनसे महिला सेना, रुपेश पाटील मनविसे जिल्हा सचिव,अमोल म्हात्रे मनविसे पेण तालुकाध्यक्ष, मनोहर पाटील मा.पेण तालुका सचिव,प्रविण म्हात्रे, समीर पाटील,ज्ञानेश्वर ठाकुर आदिसह मनसेचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.