Press "Enter" to skip to content

खालापूर पोलीस पाटील संघटनेच्या अध्यक्षपदी अनंत ठोंबरे

सिटी बेल लाइव्ह । रसायनी । राकेश खराडे । 🔷🔷🔶🔶

महाराष्ट्र राज्य गावकामगार पोलीस पाटील संघटना(रजि) खालापूर तालुका अध्यक्षपदी चौक भिलवले गावच्या अनंत रघुनाथ ठोंबरे यांची सर्वानुमते निवड झाल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांच्या मान्यतेने रायगड अध्यक्ष हरिश्चंद्र दुदुसकर व सचिव विकास पाटील यांनी एका कार्यक्रमात नियुक्ती पत्र अनंत ठोंबरे यांना देण्यात आले. अनंत ठोंबरे हे भिलवले गावचे २८ वर्षे पोलीस पाटील आहेत.सम्पूर्ण परिसरात एक समाजसेवक म्हणून त्यांची ओळख आहे.

विशेषतः आदिवासी समाज त्यांच्याकडे सल्ला,मदत,रेशनकार्ड,जातीचा दाखला,वैद्यकीय मदतीसाठी असतो. शासनाच्या प्रत्येक योजनेसाठी ते पाठपुरावा करत आहेत.अनेक आदिवासी बांधवांना त्यांच्यामुळे घरकुल मिळाली आहेत.त्यांच्या विभागात दारूबंदी आहे.नैसर्गिक आपत्ती असो,निसर्गचक्री वादळ,भिलवले धरणातील मगरिंचा उच्छाद असो,अपघात असो,रात्रीअपरात्री ते मदतीसाठी धावत असतात, तहसीलदार,पोलीस स्थानक,पंचायत समिती,ग्रामपंचायत कार्यालयात सर्वसामान्य लोकांना मदत करीत असतात.त्यांची नियुक्ती झाल्यावर खालापूर चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल विभूते,चौक सपोनि.संजय बांगर,तालुक्यातील पोलीस पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.