सिटी बेल लाइव्ह । उरण । घन:श्याम कडू । 🔷🔷🔶🔶
उरण पंचायत समितीतील कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी व केंद्र सरकारचे कर्मचारी व कामगार विरोधी धोरणाच्या निषेधार्थ कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून काम केले.
केंद्र सरकारचे कर्मचारी व कामगार विरोधी धोरण सुरू आहे. त्या अनुषंगाने राज्य पातळीवर देखील कर्मचारी कामगार न्याय हक्क विरोधी धोरणाचा अवलंब केला जात आहे.या पार्श्वभूमीवर देशपातळीवर व आपल्या राज्यात देखील कर्मचारी संघटना आज एक दिवसीय संप पुकारला होता.
त्या आंदोलनाला उरण पंचायत समितीमधील कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून काम करीत पाठींबा दर्शविला आहे. यावेळी सर्व कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावीत पाठींबा दिला.








Be First to Comment