Press "Enter" to skip to content

देशव्यापी संपाला खालापूरात पाठींबा

सिटी बेल लाइव्ह । खालापूर । मनोज कळमकर । 🔶🔶🔷🔷

विविध प्रलंबित मागण्यासाठी तालुक्यातील राज्य सरकारी, निमसरकारी कर्मचा-यानी गुरूवारी संप पुकारला होता. 2018 पासून विविध मार्गानी आंदोलन सुरू आहे. जानेवारीला देशव्यापी संप देखील करण्यात आला होता.त्यानंतर  महसूल विभागाचे लेखणीबंद आंदोलन देखील झाले होते.

जुनी पेन्शन योजना,खाजगीकरण , कंञाटी पद्धत रद्द करून कर्मचा-याना नियमित करा,मुदतपूर्व सेवा निवृती रद्द करा,केंद्रीय कर्मचा-याना मिळणारे सर्व लाभ राज्य कर्मचा-यांना मिळावे, कामगार विरोधी कायदा रद्द करणे,वेतन श्रेणी ञुटी दूर करणे,जिल्हा परिषद कर्मचारी,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे प्रलंबित प्रश्न सोङविणे,प्रत्येक गरजूला मनरेगातून 200 दिवसा रोजगार मिळाला पाहिजे याप्रमुख मागण्या साठी संप पुकारण्यात आला आहे.

खालापूरच्या नायब तहसीलदार कल्याणी कदम मोहीते यानी संपकरी कर्मचा-यांचे निवेदन स्विकारले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.