Press "Enter" to skip to content

कर्जत मध्ये 70 रक्तदात्यांनी रक्तदान करून शहिदांना वाहिली आदरांजली

सिटी बेल लाइव्ह । कर्जत । संजय गायकवाड । 🔶🔶🔷🔷


26/11 रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्या स्मरणार्थ कर्जत मध्ये रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. 70 रक्तदात्यांनी रक्तदान करून शहिदांना आदरांजली वाहिली आहे.

कर्जत पोलीस ठाणे आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने 26 /11 शहीद दिनाच्या निमित्ताने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कर्जत पोलिस स्टेशनच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराचे उद्घाटन तहसीलदार विक्रम देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी पोलीस निरीक्षक अरुण भोर, पोलीस उपनिरीक्षक राजू अल्हाट, सार्वजनिक रक्तदाते राजाभाऊ कोठारी, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे हंगामी अध्यक्ष संदीप भोईर, अभिजीत मराठे, मीना प्रभावळकर आदी उपस्थित होते. माजी नगरसेवक निलेश हरिश्चंद्रे यांनी सर्वप्रथम रक्तदान करून रक्तदान शिबिराचा शुभारंभ केला. याप्रसंगी नगरसेवक विवेक दांडेकर, नगरसेविका मधुरा चंदन, माजी नगरसेवक संतोष पाटील, भालचंद्र जोशी यांनीही रक्तदान केले. विशेष म्हणजे जेष्ठ पत्रकार विजय मांडे यांनी आपल्या 63 व्या वर्षी 64 वे रक्तदान करून शहिदांना आदरांजली वाहिली.

कल्याण येथील संकल्प ब्लड बँक चे डॉ. राजशेखरन नायर, डॉ. सोनाली देसाई, श्वेता खान, नम्रता बामुगडे, तेजश्री जाधव, प्रकाश लस्परे, नीरज नवले, सूरज नवले आदींनी रक्त संकलाचे काम केले, त्यांना सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या सदानंद जोशी, अभिजीत मराठे, निलेश परदेशी, कल्पेश शहा, मिलिंद खंडागळे यांनी सहकार्य केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.