Press "Enter" to skip to content

दस्तुरी नाका येथे मोफत वायफाय सेवा सुरू करा : मनोज खेडकर

सिटी बेल लाइव्ह । मुकुंद रांजाणे । माथेरान । 🔶🔶🔷🔷


माथेरान येथील दस्तुरी नाका अर्थात टॅक्सी स्टँड या विभागात पर्यटक व स्थानिक नागरिकांची कायम मोठ्या प्रमाणात वर्दळ असते मात्र येथे मोबाईल सेवेचे नेटवर्क अत्यंत कमकुवत आहे योग्य प्रमाणात सिग्नल मिळत नसल्याने पर्यटक व स्थानिकांना संपर्क साधने कठीण जाते .

माथेरान येथे बीएसएनएल अर्थात भारत संचार निगम व वोडाफोन या दोन प्रमुख कंपन्यांचे सीम कार्डचा वापर होतो तर जिओचा टॉवर नसल्याने सिग्नल मिळत नाही त्यामुळे दस्तुरी नाका येथे नगरपालिकेने तात्काळ मोफत वायफाय सेवा सुरू करावी व सदर सेवेचा सिग्नल एकावेळी पाचशे ते सहाशे लोकांपर्यंत पोहचला पाहिजे इतका सक्षम असावा जेणेकरून पर्यटक व्हाट्सअप्प कॉलिंग करू शकतील

माथेरान शहर काँग्रेसचे अध्यक्ष मनोज खेडकर, सुनिल शिंदे व राकेश कोकले यांनी नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांस निवेदन दिले या वेळी नगरसेवक नरेश काळे देखील उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.