सिटी बेल लाइव्ह । प्रतिनिधी । 🔷🔷🔶🔶
केंद्र सरकारने कामगार व शेतकरी विरोधी केलेले काळे कायदे रद्द करावेत यासाठी देशातील सर्व केंद्रीय श्रमिक संघटनांनी आज बंदची हाक दिली होती. रायगड जिल्हा कामगार संघटना संयुक्त कृती समिती तर्फे माजी आमदार मनोहर भोईर, इंटकचे राष्ट्रीय सचिव कामगार नेते महेंद्र घरत , कामगार नेते काँ. भूषण पाटील यांच्या नेतृत्वाखाली रायगड जिल्हातील विविध संघटनांनी उरण तहसीलदार कार्यालय येथे आंदोलन केले. चारफाटा येथून मोर्च्याने मोदी सरकार विरोधात घोषणा देत तहसीलदार उरण यांना निवेदन देण्यात आले.
या आंदोलनात विविध संघटनांतील शेकडो कामगारांनी उस्फुर्त सहभाग घेतला होता जे. एन. पी. टी. विविध अस्थापने बंद करून कामगार आंदोलनात सहभागी झाले होते.
या आंदोलनासाठी माजी आमदार मनोहर भोईर, इंटकचे राष्ट्रीय सचिव महेंद्र घरत, कामगार नेते काँ. भूषण पाटील, मिलिंद पाडगांवकर,मार्तंड नाखवा, पि. के. रमण, वैभव पाटील, किरीट पाटील,विनोद म्हात्रे, संजय ठाकूर, मधुसूदन म्हात्रे, महेंद्र ठाकूर, लंकेश ठाकूर, आशिष तांडेल, रेखा घरत, कल्पना ठाकूर, निर्मला पाटील, इत्यादी संघटनांचे पदाधिकारी व शेकडोच्या संख्येने कामगार उपस्थित होते.








Be First to Comment