Press "Enter" to skip to content

कर्जत नगरपरिषद कार्यालयात संविधान प्रास्ताविका सामुईक वाचन

सिटी बेल लाइव्ह । कर्जत । संजय गायकवाड । 🔷🔷🔶🔶

संविधान दिनानिमित्त कर्जत नगरपरिषद कार्यालयात संविधान प्रास्ताविकेचे सामुईक वाचन करण्यात आले. आज दि. 26 नोव्हेंबर रोजी सकाळी नगरपरिषद कार्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील यांनी पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर संविधान प्रास्ताविकेचे सामुईक वाचन करण्यात आले.

याप्रसंगी नगरसेविका स्वामिनी मांजरे, मधुरा चंदन, सुवर्णा निलधे, भारती पालकर तर नगरसेवक सोमनाथ ठोंबरे आदींसह नगरपरिषद कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 26/11 रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.