Press "Enter" to skip to content

चर्मकार विकास संघ तालुका श्रीवर्धन युवा अध्यक्षपदी अमोल चांदोरकर यांची नियुक्ती

सिटी बेल लाइव्ह । श्रीवर्धन । कुणाल माळवदे । 🔶🔶🔷🔷

श्रीवर्धन तालूका श्रमिक पत्रकार संघाचे सहसचिव अमोल चांदोरकर यांची चर्मकार विकास संघ महाराष्ट्र राज्य संघटनेच्या, युवा तालुका अध्यक्ष श्रीवर्धन या पदी प्रदेशाध्यक्ष संजय खामकर यांच्या मार्फत नियुक्ती करण्यात आली.

सातत्यपूर्ण सामाजिक विकास, न्यायहक्क व सन्मानाचा सर्व स्तरावरील त्यांच्या कामामुळेच तसेच त्यांनी केलेल्या सर्वांगिण कार्याचा विचार करूनच त्यांना युवा तालुका अध्यक्ष श्रीवर्धन या पदी नियुक्त करण्यात आले आहे.

श्रीवर्धन तालुका श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष उदय कळस , सर्फराज दर्जी , मकरंद जाधव , मुझफ्फर अलवारे , केतन माळवदे यांनी श्री.अमोल चांदोरकर यांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.आणि समाजहितासाठी योग्य न्याय देऊन उत्तम कार्य कराल आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या .

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.