सिटी बेल लाइव्ह । खालापूर । विकी भालेराव । 🔶🔶🔷🔷
रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांच्या कडून पोलीस दलातील बढती मिळालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना स्वतःच्या हाताने फित लावून सन्मान करण्यात आला आहे. हा कार्यक्रम पोलीस अधीक्षक कार्यालयात बुधवारी पार पडला.

नुकताच रायगड जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक म्हणून जबाबदारी स्वीकारलेले अशोक दुधे यांनी स्वतःच्या हाताने बढती मिळालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर फीत लावून त्यांचा सन्मान करण्यात आला आहे, खालापूर पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक रुपेश भोनकर यांना हवालदार म्हणून बढती मिळाली असून त्यांचा सन्मान देखील पोलीस अधिक्षकांच्या हस्ते करण्यात आला.
पोलीस अधिक्षक यांच्या हस्ते बढती देणे हा संकल्प पहिल्यांदाच रायगड जिल्ह्यात पोलीस अधिक्षक अशोक दुधे यांनी राबविला असून बढती मिळालेल्या कर्मचारी वर्गाकडून आनंद व्यक्त करण्यात आला.तर सर्व बढती मिळालेल्या कर्मचाऱ्यांना पोलीस अधिक्षक यांच्या कडुन शुभेच्छा देण्यात आल्या, हा बढतीचा कार्यक्रम अलिबाग येथे पोलीस अधिक्षक कार्यालयात संपन्न झाला.








Be First to Comment