सिटी बेल लाइव्ह / उरण (घनःश्याम कडू) ः
प्रकल्पग्रस्त 17 मुलींच्या भविष्याचे वाटोळे करणार्या जेएनपीटीच्या अखत्यारींतील चौथे बंदर म्हणून प्रसिध्द असणारे बीएमटीसी(सिंगापूर पोर्ट) ने प्रकल्पग्रस्त कामगारांच्या बाबत नवीन पवित्रा घेतला असून या अंतर्गत पोर्ट मधील काही प्रकल्पग्रस्त कामगारांना बीएमसीटी पोर्ट व्यवस्थापनाने सक्तीच्या रजेवर पाठविल्याने व्यवस्थापनाचे नेमके धोरण काय? हे समजत नसल्याने कामगार वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे.
बीएमटीसी पोर्टची निर्मिती झाल्यापासून हे बंदर नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने प्रसिध्दीच्या झोतात राहिले आहे. मुलाखतीत आणि वैद्यकीय तपासणीत पास होऊनही 17 प्रकल्पग्रस्त मुलींना नोकरीत न घेता त्यांना रस्त्यावर बसून आंदोलन करायला भाग पडल्या पासून ते जहाजाने जेट्टीला ठोकर मारून ती खिळीखीळ करेपर्यंत अनेक घटनांनी बीएमटीसी पोर्ट नेहमीच चर्चेत राहिले आहे. परंतु आज पोर्ट मधील काही प्रकल्पग्रस्त कामगारांना सक्तीच्या रजेवर पाठून पुन्हा चर्चेत आले आहे. पोर्ट व्यवस्थापने या कामगारांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचे कारण व्यवस्थापने स्पष्ट केले नसले तरी जे कारण पुढे आले ते आश्चर्याने चकित करणारे आहे. ज्या कामगारांचे वडील जेएनपीटीमध्ये नोकरीस आहेत अशाच कामगारांना बीएमटीसी पोर्ट व्यवस्थापनानेे सक्तीच्या रजेवर पाठविले आहे. त्यामुळे या कामगारांमध्ये अनेक शंका निर्माण झाल्या असून जेएनपीटी पोर्ट मधील एका बड्या अधिकार्याला कोरोनाने त्रस्त केले होते. याचा खर्च कितेक लाखात झाला होता. त्यामुळे ही वेळ आपल्या व्यवस्थापनावर तर येणार नाहीना? यातच शेजारीच असणार्या जिटीआय बंदराने कोरोनाग्रस्तांचे अर्धशतक पूर्ण केले आहे.
डीपी वर्ल्ड बंदरामध्ये कोरोना व्हायरसने आपले खाते कालच सुरु करून दोन धावा पूर्ण केल्या आहेत. जेएनपीटी बंदरात अशा काही हालचाली आहेत की काय? यामुळे तर या कामगारांना सक्तीची रजा देऊन घरी बसण्यास भाग पडले आहे, असाही एक चर्चेचा सूर कामगारात घुमू लागला आहे. आता बीएमसीटी पोर्टने मुळातच जहाजे बंदरात घेण्याचे प्रमाण कमी केले की काय? असाही एक तर्क निघत आहे. तर नियमानुसार घरटी एक नोकरी असाही एक तर्क सुरु झाला आहे, सध्या तरी या कामगारांना घरी बसून बीएमसीटी पगार देणार असल्याचे कळते, परंतु जेएनपीटीमध्ये ज्या कामगारांचे वडील कामाला आहेत त्यांनाच का सक्तीच्या रजेवर बसविले हे कारण अजूनही स्पष्ट झालेले नसल्याने कामगार वर्गातमात्र भीतीचे सावट पसरले आहे.






Be First to Comment