Press "Enter" to skip to content

सावरोली खारपाडा साईट पट्टी चे गवत कापण्यास सुरुवात

सिटी बेल लाइव्ह । काशिनाथ जाधव । पाताळगंगा । 🔷🔷🔶🔶

पावसाळ्यात मोठ्याप्रमाणावर गवत निर्माण झाल्यामुळे वाहन चालकांस वाहन चालवितांना मोठे अवघड होत.रस्त्याचे काम जरी उत्तम प्रकारे झाले असले तरी सुद्धा रस्त्याच्या साईट पट्टीला गवत वाढले होते..यामुळे रस्त्यावरील साईट पट्टी तसेच समोरील वहान येत असल्याचे दिसत नसल्यामुळे अपघातांची समस्या गंभीर बनत चालली होती.मात्र सार्वजनिक बांधकाम खात्याच्या माध्यमातून या रस्त्याचे काम देण्यात आले होते त्या कॉंट्रक्टर यांनी गवत कापण्यास सुरुवात केल्यामुळे काही दिवसातच गवत कापून होइल असे मत गवत कापणा-या कामगारांनी व्यक्त केले.

सावरोली – खारपाडा या रस्त्याचे काम दोन वर्षापूर्वी पुर्ण झाल्यामुळे अनेक प्रवासी वर्गांना खड्याच्या त्रासापासून सुटका झाली होती.त्याच बरोबर रस्त्याचे काम चांगल्या प्रमाणे झाल्यामुळे अनेक प्रवासी वर्ग समाधान व्यक्त करीत होते.मात्र रस्त्याच्या साईट पट्टीला वाढलेल्या गवतामुळे वहान चालक नाराजी व्यक्त करत होते.अखेर सार्वजनिक बांधकाम यांच्या माध्यमातून या रस्त्याच्या साईट पट्टीला वाढलेले गवत कापण्याच्या कामाला मुहुर्त सापडल्याने या मार्गावरील प्रवास आता सुखमय होत आहे.

पाऊस संपल्या नंतर रस्त्यावरील असलेले गवत पुर्णपणे सुकून गेले होते.मात्र रस्त्याच्या बाजूला वणवा लागू नये किंवा ते जाळण्याचा प्रकार घडू नये यासाठी गवत कापणींचे काम जलद गतीने सुरु असल्याचे या ठिकाणी पहावयास मिळत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.