सिटी बेल लाइव्ह / गोवे-कोलाड (विश्वास निकम )
रोहा तालुक्यातील बाहे गावचे गुणाजी सहदेव थिटे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.मृत्यू समयी त्यांचे वय ६९ वर्षाचे होते.ते प्रेमळ स्वभावाने सर्वाना परिचित होते.
सद्या कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे त्यांच्या अंत्यविधीसाठी मोजकेच नागरिक उपस्थित होते.मात्र असंख्य नागरिकांनी त्यांना मोबाईलच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली.त्यांच्यावर बाहे येथील स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी,एक मुलगी,दोन भाऊ,तीन भावजया,पुतणे,नातवंडे व मोठा थिटे परिवार आहे.त्यांचे दशक्रिया विधी व उत्तरकार्य विधी मंगळवार दि.२१ जुलै २०२० रोजी दोन्ही एकाच दिवशी त्यांच्या राहत्या निवासस्थानी होणार आहेत.






Be First to Comment