Press "Enter" to skip to content

PMC मध्ये समावेश केलेल्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी मानले आमदार प्रशांत ठाकूर यांचे आभार

105 ग्रामपंचायत कर्मचार्‍यांचा पनवेल महापालिकेच्या सेवेत समावेश

कर्मचारी प्रतिनिधींनी आमदार प्रशांत ठाकूर, महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर यांना दिले धन्यवाद !

पनवेल महापालिकेची 1 ऑक्टोबर 2016 रोजी स्थापना झाल्यानंतर तालुक्यातील 23 ग्रामपंचायतींचा समावेश महापालिकेत करण्यात आला. या ग्रामपंचायतींमध्ये काम करणार्‍या कर्मचार्‍यांनी महापालिकेत समावेश व्हावा या मागणीसाठी अनेक वेळा आंदोलन केले होते. महापालिकेच्या या समावेशन प्रकियेला जिल्हा परिषदेकडून आवश्यक सहकार्य न मिळाल्यामुळे ही प्रक्रिया लांबली. कर्मचारी समावेशनासाठी नगरविकास विभागाने कोकण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली. कोकण आयुक्तांनी नगरविकास विभागाला हा अहवाल 25 जानेवारी 2019 रोजी सादर केला. अहवाल सरकारला सादर करूनही त्याबाबतचा निर्णय अद्याप प्रलंबित असल्याने कर्मचार्‍यांकडून संताप व्यक्त करण्यात येत होता. अखेर 288 कर्मचार्‍यांचा सोमवारी (दि. 23) महापालिकेच्या सेवेत समावेश करण्यात आला आहे.महापालिकेत समावेश झाल्यामुळे कर्मचाऱ्यांनी आमदार प्रशांत ठाकूर, महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर यांचे आभार मानले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.