Press "Enter" to skip to content

कांजुरमार्ग येथे बालयुवक साई उत्सव मंडळ व माऊली प्रतिष्ठान आयोजित रक्तदान शिबीर

सिटी बेल लाइव्ह / मुंबई (पंकजकुमार पाटील) :

कांजुरमार्ग (पुर्व )येथील बालयुवक साई उत्सव मंडळ, मिराशी नगर व माऊली प्रतिष्ठान (रजि)यांच्या वतीने व ब्लड बँक जे. जे. शासकीय रुग्णालय, भायखळा यांच्या सहकार्याने विक्रोळी विधानसभा आमदार सन्माननीय श्री. सुनिलभाऊ राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन रविवार दि. १९ जुलै २०२० रोजी सकाळी १०:०० ते ०३:०० या वेळेत सेंट फ्रान्सिस झेविअर्स हायस्कूल (चर्च शाळा ), मेन मार्केट, कांजुरमार्ग (पूर्व) याठिकाणी करण्यात आले आहे. या शिबिराचे मुख्य आयोजक मान. विठ्ठलशेठ बबन नाकाडे(संस्थापक /अध्यक्ष-माऊली प्रतिष्ठान)आहेत. मुंबईसह महाराष्ट्र व संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना या आजारामुळे अस्मानी संकट ओढवले आहे. या कठीण परिस्थितीत रक्ताचा तुटवडा भासू नये यासाठी सामाजिक बांधिलकी म्हणून सदर 'रक्तदान शिबिर' आयोजित केले आहे. यावेळी प्रत्येक रक्तदात्यास आकर्षक भेटवस्तू दिली जाणार आहे. मुख्य बाब म्हणजे सुरक्षेसाठी या शिबिरात सामाजिक अंतर ( social distancing -3 फूट ) ठेवण्यात येईल, शासनाच्या सर्व अटी व शर्तींचे पालन करणे बंधनकारक असेल. तसेच रक्तदात्यांना घरापासून-कार्यक्रमस्थळी येण्या-जाण्याची प्रवासाची व्यवस्था मंडळातर्फे केली जाणार आहे. सर्दी, ताप, खोकला इ. लक्षणे असलेल्या रक्तदात्यांनी नोंदणी करू नये व रक्तदानास येताना मास्क घालून येण्याचे आवाहन देखील आयोजकांनी केले आहे. या रक्तदान शिबिरासाठी इच्छुक रक्तदात्यांनी खालील लिंक वर क्लिक करून किंवा खालील संपर्क क्रमांकावर फोन / whatsapp करून पूर्व नोंदणी करणे अत्यावश्यक आहे.

Registration Link

https://forms.gle/EP8UWsQwtDiHv2pD6

संपर्क क्रमांक :-

सचिन हडकर 9594781343

सिद्धार्थ कदम 7045082424 / 9987313007 तेव्हा रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान समजून या शिबिरास विभागातील जनतेने अधिकाधिक संख्येने प्रतिसाद दयावा असे बालयुवक साई उत्सव मंडळ व माऊली प्रतिष्ठान यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले आहे .

More from मुंबईMore posts in मुंबई »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.