सिटी बेल लाइव्ह / पेण /वार्ताहर :
पेण तालुक्यातील वाशी गावाच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
या गावातील उच्च शिक्षित,सर्वांचे लाडके व आदर्श व्यक्तिमत्व डॉ. अनिरुद्ध बाळकृष्ण पाटील यांची अमेरिकन जर्नल ऑफ बायोसायन्स आणि बायोइंजिनिअरिंग, सायन्स पब्लिशिंग ग्रुप च्या आंतरराष्ट्रीय ग्रुप च्या बोर्ड वर सदस्यपदी नेमणूक झाली आहे. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या पाटील यांनी आपले प्राथमिक-माध्यमिक शिक्षण गावातील शाळेत पूर्ण केले. त्यानंतर स्वतःचे अस्तित्व सिद्ध करण्याची मनात उमेद ठेवून आत्मचिंतन, मनन, अभ्यासाची ओढ तसेच कुटुंबातील परिस्थितीची जाण लक्षात घेऊन प्रथम डीएड नंतर १२ वी सायन्स, पुढे B.sc. in chemistry व M.sc. in chemistry अशी डिग्री प्राप्त केली. पुढे नोकरी सांभाळत पाच वर्षे खर्ची घालून Ph.D ही पदवी देखील संपादन केली. त्यानंतर मुंबई विद्यापीठ येथे प्राध्यापक पदाच्या नोकरी दरम्यान अमेरिका येथून पदव्युत्तर शिक्षण व त्यानंतर चिन येथे ३ वर्षे प्राध्यापकी करीत असतांना Post Doctoral असे पदव्युत्तर शिक्षण घेतलेले आहे. इतके उच्च शिक्षण घेऊन व उच्च पदावर काम करून सुद्धा त्यांच्या मनात याचा जरादेखील गर्व नाही.
त्यांच्या या नेमणुकीबद्दल ग्रामस्थ मंडळी, नातेवाईक, मित्र परिवार यांच्याकडून अभिनंदन व कौतुकाचा वर्षाव केला जात आहे






Be First to Comment