डोलकाठीच्या तुऱ्या वर बांधण्यासाठीचा गरुड ध्वज ढाक डोंगरावरून आणला :
यात्रा रद्द, दर्शन मिळणार 🔷🔷🔶🔶
सिट
सिटी बेल लाइव्ह । कर्जत । संजय गायकवाड । 🔶🔷🔷🔶
देऊळवाडी किरवली येथील कार्तिक पौर्णिमेच्या उत्सवासाठी परंपरेनुसार डोलकाठीच्या टोकाला ढाक डोंगरावरील चढण्या – उतरण्यास अत्यंत कठीण असलेल्या भैरी मंदिरातून गरुड ध्वज आणला मात्र यंदा कोरोनाच्या संकटामुळे यात्रा रद्द करण्यात आली असून भाविकांना सर्व शासकीय नियम पाळून दर्शन घेता येणार आहे.
सकाळी गरुड ध्वजाची पूजा ट्रस्टचे अध्यक्ष किसन जैतु बडेकर यांच्या हस्ते मंदिरात करण्यात आली. त्यानंतर श्री ग्रामदेवी बहिरी तळई संस्थान, देऊळवाडी किरवली चे सचिव दिलीप बडेकर, बिपीन बडेकर, प्रभाकर बडेकर, जीवन बडेकर, जनार्दन बडेकर, ज्ञानेश्वर जाधव, राजेश बडेकर, दीपक मोरे, हितेश काठवले, राज बडेकर, किरण गायकवाड, तेजस बडेकर, योगी बडेकर, सोहम बडेकर, सौरभ बडेकर, अविनाश खंडागळे, संकेत बडेकर, निखिल पन्हाळे, प्रकाश बडेकर आदी ग्रामस्थ गरुड ध्वज आणण्यासाठी ढाक डोंगरावर गेले होते. तो गरुडध्वज ढाक भैरी मंदिरात आणल्या नंतर गरुड ध्वजाची पूजा पुरोहित गजानन उपाध्ये यांच्या हस्ते करून अभिषेक करण्यात आला.
त्यानंतर हे सारे भाविक भक्त मार्गस्थ झाले. हा गरुड ध्वज देऊळ वाडी येथे आणण्यात आला. हा ध्वज ढोलकाठीच्या तुऱ्यावर बांधण्यात येणार आहे. त्यांनतर रविवारी 29 नोव्हेंबर रोजी ही डोलकाठी मंदिराजवळ उभी करण्यात येणार आहे. 30 नोव्हेंबर रोजी कार्तिक पौर्णिमेला या डोलकाठीचा मोर पिसाऱ्याने शिवमंदिरातील शिवपिंडीला आरतीच्या वेळी वारा घालून ही तीस फुट उंचीची डोलकाठी हनुवटीवर, दातांवर, कपाळावर व हातावर ठेऊन नाचविण्यात येते. हे दृश्य फारच रोमांचकारक असते. मात्र यंदा कोरोनाचे संकट असल्याने परंपरागत असलेली यात्रा रद्द करण्यात आली असून भाविकांना शासकीय नियम पाळून दर्शन देण्यात येणार आहे.
पालखी मिरवणुकीची परवानगी मिळाल्यास मोजक्याच ग्रामस्थांच्या उपस्थितीत पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे.








Be First to Comment