सिटी बेल लाइव्ह । मुकुंद रांजाणे । माथेरान । 🔶🔶🔷🔷
पंतप्रधान सिद्धी योजनेचा लाभ येथील पथ विक्रेत्यांना झाला असून एकूण सतरा जणांना दहा हजार रुपये कर्ज स्वरूपात वाटप पत्र देण्यात आले आहेत. नगरपरिषदेने शासनाच्या मार्गदर्शनानुसार पाठपुरावा करून गरजवंत पथ विक्रेत्यांना याचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले होते. नगरपरिषदेच्या कार्यालयात पथ विक्रेत्यांना बोलावून हे वाटप करण्यात आले.
यावेळी नगराध्यक्षा प्रेरणा सावंत, उप नगराध्यक्ष आकाश चौधरी, मुख्याधिकारी प्रशांत जाधव,कार्यालय अधीक्षक रणजित कांबळे,वरीष्ठ लीपिक नरेंद्र धनावडे,युनियन बँकेचे शाखा अभियंता बनसोडे यांसह अन्य लोकप्रतिनिधी उपस्थित होते.








Be First to Comment