Press "Enter" to skip to content

सारडे विकास मंच आयोजित किल्ले स्पर्धेला उदंड प्रतिसाद

सिटी बेल लाइव्ह । सारडे । नागेन्द्र म्हात्रे । 🔷🔷🔶🔶

छत्रपति शिवाजी महाराज आणि गड़किल्ले ही संकल्पना बाजुला सारता येत नाही जो पर्यन्त चंद्र सूर्य असतील तो पर्यन्त महाराजानी दाखविलेले शौर्य अबाधित राहील व कर्तुत्व अमर राहील व किल्ले या विषयी कुहुतूलता असून प्रत्येकाला महाराजानी केलेले पराक्रम व दुर्ग याची प्रचिती व्हावी अतुलनीय केलेले पराक्रम हे संपूर्ण जगासमोर एक आदर्श निर्माण झाला आहे.

रयतेचा राजा शिवकल्याण राजा हे राज्य व्ह्यावे ही श्रींची इछा रयतेच्या केसाला सुद्धा धक्का लागता कामा नये ही रयतेच्या राजाची शिकवण यासाठी सारडे विकास मंच तर्फे दरवर्षी प्रमाणे या वर्षी ही किल्ले स्पर्धा घेण्यात आली.

किल्ले स्पर्धेत सर्व स्पर्धकांनी दर्जेदार असे किल्ले तयार केले. एकूण 44 स्पर्धक सहभागी झाले. त्यात हुबेहूब प्रतिकृती ह्या ज्या स्पर्धकांनि काढल्या तोरणा , रायगड , मालवण , राजगड प्रतापगड सिहगड सर्व किल्ले होते. उत्तम 3 किल्ल्याना गौरविण्यात आले. प्रथम आयुष महेंद्र पाटील, द्वितीय सुयोग पाटील, उत्तेजनार्थ राज घरत, रोहन पाटील यांनी मिळविले.

या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे सर्व स्पर्धकांना संस्थेचे मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. सदर पारितोषिक वितरण साठी प्रमुख मान्यवर सौ हेमालीताई म्हात्रे , श्री रोहित पाटील अल्पेश जोशी , सुयश क्लासेस आवरे चे अध्यक्ष श्री निवास गावंड सर हे मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम साठी पारितोषिक हे विनायक सदानंद म्हात्रे प्रथम द्वितीय व त्रितीय भव्य ट्रॉफी व सर्व स्पर्धकांना रोहित पाटील यांजकडून सन्मानचिन्ह हे देण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन सारडे विकास मंच चे अध्यक्ष श्री नागेंद्र म्हात्रे सर यांनी केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.