Press "Enter" to skip to content

मोरे दांपत्याच्या अभिनव संकल्पनेला राविशेठ पाटील यांचा मानाचा मुजरा.

सिटी बेल/ वहाळ.

नवजात मुलीला दत्तक घेत सचिन आणि राजेश्री मोरे यांनी समाजाला दिला आदर्श

लेक जगवा,लेक वाचवा अशा अभियानातून कार्य करणारे कित्येक जण वास्तवात मात्र वंशाला दिवा हवा अशी सुप्त भावना मनात ठेऊन असतात.परंतु हे अभियान बोलण्याचे नसून कृती करून दाखवण्याचे असल्याचा खणखणीत संदेश मोरे दांपत्याने दिला आहे.अवघ्या 19 दिवसांच्या मुलीला दत्तक घेऊन त्यांनी स्तुत्य असा सामाजिक पायंडा घालून दिला आहे.
नुकतेच सचिन  व राजेश्री मोरे यांनी गोंडस कन्येसह वहाळ येथील श्री साई देवस्थानात जाऊन साई बाबांचे दर्शन घेतले .यावेळी श्री साई देवस्थान चे संस्थापक अध्यक्ष रविशेठ पाटील यांनी मोरे दांपत्याचे कौतुक करत त्यांचा सन्मान केला.त्यावेळी रा जी प च्या माजी सदस्य पार्वती ताई पाटील त्यांच्या समवेत उपस्थित होत्या.
लेक वाचवावी पण ती दुसऱ्यांनी,मी नाही! अशी स्वार्थी भावना समाजात वाढत आहे.मुलीच्या पाठीवर मुलगी होऊ नये म्हणून कित्येक जोडपी क्लृप्त्या काढत असतात.अशा जगाला स्वकृतीतून संदेश देणाऱ्या मोरे कुटुंबीयांचे कौतुक करावे तितके थोडे आहे.मुलगा मुलगी एक समान असून त्यांच्यात भेद करणारे मानसिक दृष्ट्या कमकुवत असतात.मोरे दांपत्याने समाजाला एक नवा आदर्श घालून दिला आहे.त्यांच्या अत्यंत सजग आणि सामाजिक निर्णयाला मी मानाचा मुजरा करतो अशी भावना रविशेठ पाटील यांनी व्यक्त केली.
तर मुलगी घरात आल्याने घराला खऱ्या अर्थाने घरपण आल्याची भावना मोरे दांपत्याने व्यक्त केली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.