सिटी बेल लाइव्ह । रायगड । अमूलकुमार जैन । 🔷🔷🔶🔶
इयत्ता ९ वी ते इयत्ता १२ वी.पर्यंतचे वर्ग दि.२३ नोव्हेंबर पासून सुरु करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.त्या पार्श्वभूमीवर माध्यमिक शिक्षकांची कोविड -१९ (आर.टी.पी.सी.आर.) तपासणी करण्यात येत आहे. मुरुड ग्रामीण रुग्णालयात तालुक्यातील ३०२ माध्यमिक शिक्षक व कर्मचाऱ्यांची दि.१९,२० व दि.२१ नोव्हेंबर २०२० कालावधीत तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत १६५ जणांची तपासणी करण्यात आली असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. निलेश बोरकर व डॉ. दिव्या सोनम यांनी दिली.
कोरोना पार्श्वभूमीवर तब्बल आठ महिन्यांनंतर माध्यमिक शाळेतील इ.९ वी.ते.इ.१२ वी.चे वर्ग दि.२३ नोव्हेंबर पासून सुरु होत असल्याने विद्यार्थी, पालक व शिक्षक वर्गात उत्सुकता दिसून येते आहे.








Be First to Comment