Press "Enter" to skip to content

अनेक वर्षांपासून खाच खळग्याच्या रस्त्यापासून होणार रुग्णांसाहित नागरिकांची सुटका

सिटी बेल लाइव्ह । रायगड । अमूलकुमार जैन । 🔶🔶🔷🔷

मुरूड साळाव या राज्यमहामार्ग दरम्यान असणाऱ्या बोर्ली ग्रामपंचायत हद्दीतील बोर्ली फाटा ते बोर्ली प्राथमिक आरोग्य केंद्रपर्यंत रस्ता हा अनेक वर्षांपासून खाच खळग्याच्या रस्त्यापासून रुग्णांसहित नागरिकांची सुटका लवकरच होणार असल्याचे अलिबाग मुरूडचे आमदार महेंद्र दळवी यांनी या रस्त्याच्या भूमिपूजन वेळी केले.

आमदार. महेंद्र दळवी यांनी सांगितले की,या रस्त्याची दुर्दशा झाली होती तसेच रुग्णालयात उपचार साठी येणार्‍या रुग्णांना तसेच शाळेत जाणार्‍या मुलांच्या बसेस व इतर लोकांना खूप त्रास होत होता हा बोर्ली गावात असणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रात येणारा महत्त्वाचा रस्ता आहे.मात्र या रस्त्याकडे गेल्या पंधरा वर्षांपासून कानाडोळा होत आहे.भूमिपूजन केले जाते मात्र कोणत्यातरी कारणाने रस्ता रखडला जातो आणि हा रस्ता का रखडला जातो हे गुलदस्त्यातच आहे.हा रस्ता कोव्हिडं या फंडातून विशेष बाब म्हणून रायगड जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडून बोर्लीचे माजी सरपंच नौशाद दळवी यांच्या प्रयत्नातुन मंजूर करून घेण्यात आला आहे.या रस्त्यासाठी बोर्ली शाखाप्रमुख भारत भोईर यांनी सतत अलिबाग येथे जाऊन पाठपुरावा केला आहे.

सदर रस्त्यामुळे बोर्ली प्राथमिक आरोग्य केंद्रात येणाऱ्या रुग्णांना दिलासा मिळणार आहे.मी आमदार असलो तरी प्रथम मी जनतेचा सेवक आहे.
यावेळी जिल्हापरिषद सदस्या राजश्री मिसाळ,तालुका प्रमुख ऋषिकांत डोंगरीकर, बोर्ली शाखाप्रमुख भारत मोती,निवृत्त पोलीस निरीक्षक चंद्रशेखर भोईर,मनोज कमाने,विलास पालवणकर आदीसहित पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

12 एप्रिल 2018 मध्ये तत्कालीन पालकमंत्री तथा विद्यमान आमदार रविंद्र चव्हाण यांनी सुद्धा या ठिकाणी भूमिपूजन केले होते.त्यावेळी आमदार तथा तत्कालीन जिल्हाप्रमुख प्रशांत ठाकूर,उपस्थित होते. मात्र रस्ता झाला नाही आणि तो का झाला नाही ह्याचे उत्तर त्यांचेच पदाधिकारी देऊ शकतील.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.