कर्जत नगरपरिषदेच्या एका कामाचे लोकार्पण व दोन कामांचे भूमिपूजन 🔷🔷🔶🔶
सिटी बेल लाइव्ह । कर्जत । संजय गायकवाड । 🔶🔷🔷🔶
कर्जत नगरपरिषदेच्या वतीने एक कामाचे लोकार्पण व दोन कामाचे भूमिपूजन करण्यात आले, कोरोना महामारी मुळे शासनाच्या नियमांचे पालन करून हा उदघाटन समारंभ करण्यात आला.

नगरपरिषद क्षेत्रातील मौजे दहिवली सुयोग नगर येथे विनायक अपार्टमेंट ते दास्ताने यांच्या घरापर्यंत दुतर्फा बंदिस्त गटार काम 18 लाख 66 हजार 802 रुपये खर्च करून नगर परिषद निधीतून बांधण्यात आलेल्या गटाराचे लोकार्पण करण्यात आले. तर मौजे मुद्रे येथील चंद्रकांत मोरे यांच्या घरापर्यंत गल्ली रस्ता नगर परिषद निधीतुन 1 लाख 92 हजार 158 रुपये खर्च करून बांधण्यात येणाऱ्या तसेच मौजे मुद्रे येथील नितिन बिवलकर यांच्या घरासमोरील गल्ली रस्ता नगर परिषद निधीतुन 1लाख 91हजार 755 रुपये खर्च करून बांधण्यात येणाऱ्या दोन कामाचे भूमिपूजन नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी उपस्थित सर्व सदस्यांनी मास्क आणि सोशल डिस्टन्स चे नियम पाळून हा कार्यक्रम पार पाडला. याप्रसंगी उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, गटनेते नितीन सावंत, विरोधी पक्ष नेते शरद लाड, बांधकाम सभापती विवेक दांडेकर, नगरसेवक संकेत भासे, गरसेविका सुवर्णा निलधे,भारती पालकर,पुष्पा दगडे, नगर अभियंता मनीष गायकवाड, सारिका कुंभार, भानुदास पालकर, प्रदीप वायकर, दर्शन वायकर, मनीषा भासे, जनार्दन भासे, अनंत निलधे, बिवलकर गुरुजी,मोधळे, आणि त्या प्रभागातील स्थानिक नागरिक उपस्थित होते.








Be First to Comment