सिटी बेल लाइव्ह । रसायनी । राकेश खराडे । 🔶🔶🔷🔷
महिला उत्कर्ष समितीच्या प्रदेश कार्याध्यक्ष श्रुती उरणकर यांचा वाढदिवस आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला.
कोरोना महामारीमुळे अनेक ठिकाणी रक्ताचा तुटवडा जाणवत आहे .हा विचार करुन त्यांनी वाढदिवसादिनी स्वतः रक्तदान करून नवा पायंडा पाडला तसेच आपल्या अनेक सहकाऱ्यांना सुद्धा रक्तदान करण्यास प्रोत्साहित केले. यावेळी विभागातील अनेकांनी रक्तदान केले. तसेच त्यांनी मरनोत्तर दृष्टी दानाचा ही संकल्प करून एक वेगळा आदर्श सर्वांसमोर ठेवला आहे.
यावेळी पत्रकार उत्कर्ष समिती अध्यक्ष डॉ. अशोक म्हात्रे, सचिव डॉ. वैभव पाटिल, प्रदेश कार्याध्यक्ष अविनाश म्हात्रे, नवी मुंबई अध्यक्ष लालचंद यादव व कोकण अध्यक्ष तथा जनजागृती सेवा समिती प्रमूख गुरुनाथ तिरपणकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी जनजागृती सेवा समितीतर्फे वनवासी कल्याण आश्रम येथे नागालँड येथील विद्यार्थ्याना दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले.








Be First to Comment