सिटी बेल लाइव्ह । उरण । घन:श्याम कडू । 🔷🔷🔶🔶
उरण बोरी गावातील नवदुर्गा नवरात्रोत्सव व बोरी ग्रामस्थ यांच्यावतीने दरवर्षी किल्ले बनवा इतिहास जागवा स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. यावर्षीच्या स्पर्धेत बोरी गावातील ६ तरुणांनी एकत्रितपणे रायगड किल्ल्याची हुबेहूब प्रतिकृती बनविली आहे. ही प्रतिकृती बघितल्या नंतर साक्षात रायगड किल्ला असल्याचा भास निर्माण होतो.
या स्पर्धेत मुलांमध्ये किल्ल्यांविषयी व त्यांच्या इतिहासाविषयी माहिती व्हावी तसेच दिवाळीत मातीचे किल्ले बनविण्यासाठी बच्चे कंपनी पुढे यावीत या हेतूनेच नवदुर्गा नवरात्रोत्सव मंडळ बोरी व बोरी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

या स्पर्धेत बोरी गावातील कौस्तुभ मालुसरे, प्रथम मालुसरे, रुद्रा ठाकूर, विघ्नेश चव्हाण, अर्णव लोणारे व माही लोणारे या ६ तरुणांनी एकत्रितपणे रायगड किल्ल्याची हुबेहूब प्रतिकृती बनविली आहे.

या बनविलेल्या किल्ल्याचा फोटो पाहिल्यावर त्यामध्ये रायगड वरच्या वास्तू बांधल्या आहेत. त्यामध्ये राणी महल, परदेशी पाहुणे निवास, भवानी मंदिर, रायरेश्वर मंदिर, बाजारपेठ, मशिद, हत्ती तलाव, महादरवाजा, टकमक टोक, हिरकणी बुरुज, प्रवेश द्वार, श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी अशा वास्तू बांधल्या आहेत
या बाबत कौस्तुभ दत्ता मालुसरे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की रायगड किल्ल्याची प्रतिमा बनवण्यासाठी आम्हां ६ जणांना पंचवीस दिवस लागले, हा किल्ला बनविताना दगड लाल माती विटा आदींचा वापर करण्यात आल्याचे सांगितले. ही प्रतिकृती बघितल्यानंतर रायगड किल्ल्याची हुबेहूब प्रतिकृती असल्याचा भास निर्माण होतो.








Be First to Comment