Press "Enter" to skip to content

विन्हेरे तुळशी मार्गे खेड या गाडीचे कोलाड येथे स्वागत

सिटी बेल लाइव्ह । गोवे-कोलाड । विश्वास निकम । 🔶🔶🔷🔷

दिवाळीच्या पहाटे शुभमुहूर्तावर सुरू झालेल्या ठाणे विन्हेरे तुळशी मार्गे खेड या गाडीचे कोलाड येथे आल्यानंतर सत्कार करण्यात आला. गाडीला हार अर्पण करून , चालक- वाहक यांना शुभेच्छा देण्यात आल्या. या प्रसंगी वैभव दरेकर, श्री अक्षय सावंत , श्री समाधान साबळे रोहा- कोलाड येथील कोंकणवासीय उपस्थित होते.

दिवाळीच्या शुभुहूर्तावर एसटी विभागाची दररोज ठाणे -पनवेल- महाड – विन्हेरे – तुळशी – तुळशी रोड जंक्शन मार्गे खेड गाडी दिनांक १३.११.२०२० पासून ठाणे (खोपट) येथून सकाळी ०६.०० वाजता निघून अंदाजे १२.०० वाजेपर्यंत खेड येथे पोचेल आणि अंदाजे दुपारी ०२.०० वाजता पुन्हा त्याच मार्गाने परतीचा प्रवास सुरू होऊन ठाणे येथे रात्रौ ०८.०० वाजता संपेल.

कोंकण विकास समितीने आज तगायत विविध समाजोपयोगी कामे केली आहेत. समितीचे अध्यक्ष जयवंत दरेकर यांच्या मार्फत समितीची काम जोमाने चालू आहेत. सदर समिती मध्ये रत्नागिरी पासून अगदी पनवेल पर्यंत सर्व मान्यवर कार्यरत आहेत.(सर्वपक्षीय राजकीय लोक) त्यापैकी काही मुंबई आणि पुणे स्थित आहेत परंतु आपले गाव याविषयी अत्यंत निष्ठा आणि जिव्हाळा असणारे आहेत.

या समितीच्या माध्यमातून नवीन रेल्वे चालू करणे , विविध एक्सप्रेस गाड्यांना काही थांबे मिळवून देणे, एस टी च्या फेऱ्या चालू करणे आणि रस्ते व पर्यटन विकास याबाबत लक्ष देणे अशी कामे चालतात.

सदर समितीने ठाणे ते खेड ही विन्हेरे तुळशी मार्गे बस चालू करण्या करता .परिवहन मंत्री श्री अनिल परब साहेब त्यांच्याकडे निवेदन दिले होते आणि तसा पाठपुरावा देखील समितीने केला होता. याचं फलित म्हणून दि 13.11.20 रोजी ही गाडी पहिल्यांदा धावली. सर्वप्रथम ठाणे खोपट मध्ये जोरदार स्वागत शुभारंभ करून गाडी निघाली. कोलाड येथे स्वागत झालं, विन्हेरे येथे ग्रामस्थ जमले होते आणि तुळशी येथे जंगी स्वागत झाले.

सदर गाडी महाड ते खेड हे अंतर नेहमीच्या महामार्गने न जाता ,विन्हेरे तुळशी या निसर्गरम्य परिसरातून जाईल.गाडी सकाळी 6 वाजता ठाणे येथून सुटेल आणि दुपारी 12 वाजेपर्यंत खेड ला पोहोचेल, तसेच दुपारी 2 वाजता खेड येथून निघून रात्री 8 वाजता ठाणे येथे पोहोचेल.

कोकण विकास समिती ची मोट श्री जयवंतराव दरेकर ( निवृत्त पोलीस अधीकारी – गुन्हे अन्वेषण विभाग – मुंबई पोलीस ) यांनी बांधली आहे.

दि. १३.११.२०२० पासून ठाणे (खोपट) येथून सकाळी ०६.०० वाजता पहिल्या गाडीला हिरवा झेंडा दाखवला गेला तसेच चालक-वाहक यांचा सत्कार करण्यात आला. कार्यकमास मा. जयवंतराव दरेकर, मा. नरेश सुतार, मा. दिलीप कदम व अनेक प्रवासी उपस्थित होते. या वेळी वैभव दरेकर यांचे उपस्थितांनी विशेष आभार मानले.जास्तीत जास्त लोकांनी या सुविधेचा फायदा घ्यावा असे आवाहन कोकण विकास समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.