Press "Enter" to skip to content

उरण मधील स्थानिक भूमीपुत्रांच्या अपघाती मृत्यूस जबाबदार कोण ?

उरण पनवेल मार्गावरील अवैध पार्किंग व बेकायदेशीर उभ्या वाहनांमुळे गेला पत्रकाराचा बळी 🔶🔶🔶

उरण तालुक्यातील विंधणे गावातील पत्रकार, शिक्षक व पोलीस पाटील म्हणून कार्यरत असलेले समाधान म्हात्रे यांचा अपघातात मृत्यू

उरण पनवेल मार्गांवर कुंडेवहाळ येथे अज्ञात वाहनाने दिली धडक

उरण तालुक्यातील चिरनेर, दिघोडे, करळ फाटा,JNPT परिसर, दास्तान फाटा, जासई बस स्टॉप, शिर्के बस स्टॉप येथे तर पनवेल तालुक्यातील गव्हाण फाटा, कुंडेवहाळ येथे नेहमी अवैध पार्किंग

आजपर्यंत अपघातामुळे उरण तालुक्यातील 800 हुन अधिक स्थानिक भूमिपुत्रांचा अपघातात मृत्यू.

अवैध पार्किंग करणाऱ्या व बेकायदेशीर वाहने उभ्या करणाऱ्या वाहन चालक मालकांवर कायदेशीर कारवाई करण्याची जनतेतून मागणी.

सिटी बेल लाइव्ह । उरण । विठ्ठल ममताबादे । 🔷🔷🔶🔶

पनवेल येथून कोविड तपासणी करून उरणकडे निघालेल्या शिक्षकांच्या दुचाकीला अनोळखी वाहनाने धडक दिली या अपघातात दुचाकीवरील शिक्षक व शिक्षिकेचा गुरुवारी दि 19/11/2020 रोजी दुपारी 2 च्या सुमारास पळस्पे ते जेएनपीटी मार्गावरील कुंडे वहाळ येथे अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

समाधान म्हात्रे विंधणे -उरण वय 36, शर्मिला शर्मा उलवे वय 36 या दोघां व्यक्तींचा अज्ञात वाहनाच्या धडकेने अपघातात मृत्यू झाल्याने पनवेल शहर पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आले आहे. दोघेही खांदा कॉलनी येथील महात्मा एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. शाळा सुरु होण्यापूर्वी शिक्षकांना कोविड तपासणी करण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या त्यामुळे समाधान आणि शर्मिला हे पनवेल वरून उरणला जाताना त्याच्या अपघातात मृत्यू झाला. त्यांच्या या अपघातामुळे उरण तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त केले जात आहे. त्यांच्या या अपघातामुळे उरण पनवेल तालुक्यातील दलालांच्या आशीर्वादाने सुरु असलेल्या अवैध पार्किंग, बेकायदेशीर उभ्या वाहनांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.कारण यामुळेच उरण मधील स्थानिक भूमिपुत्रांचे अपघात होऊन मृत्यू झाले आहेत.याला मृत्यू नव्हे तर हत्याच म्हणावे लागेल.

उरण तालुक्यातील विंधणे नवापाडा येथील तरुणाचा कुंडेवहाळ तालुका पनवेल येथे अपघात झाला त्या अपघातामध्ये विंधणे गावचे पोलीसपाटील पत्रकार तसेच शिक्षक म्हणून कार्यरत असलेले समाधान म्हात्रे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.आई-वडिलांचा एकुलता एक असा हा समाधान अपघातात सर्वांना सोडून गेला, परंतु प्रश्न असा आहे की उरण पनवेल या तालुक्यातील विविध समाजातील अनेक तरुणांना अशा दुर्दैवी अपघाताला बळी पडावे लागले आहे.

रस्त्यावर उभी असलेली अवजड वाहनांसाठी लॉजिस्टिक आणि तत्सम व्यवसायिकांनी वाहनतळ म्हणजे पार्किंग ची सोय करणे बंधन कारक आहे तरी सुद्धा चिरनेर दिघोडे ते गव्हाण फाटा व गव्हाण फाटा ते करळ फाटा जेएनपीटी पर्यंत तसेच उरण पनवेल मार्गांवर विविध ठिकाणी कंटेनर बेकायदेशीरपणे उभे राहिलेले दिसतात त्यामुळे स्थानिक भूमिपुत्रांचे अनेक अपघात झाले त्यामध्ये अनेकजण मृत्युमुखी पडले हे अपघात नसून भूमिपुत्रांच्या हत्या आहेत असे मत परिसरातील नागरिकांनी व्यक्त केले आहे.उरण मधील विविध सामाजिक संस्था, पत्रकारांनी कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियाद्वारे पत्रकार समाधान म्हात्रे यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.