सिटी बेल लाइव्ह । कर्जत । संजय गायकवाड । 🔷🔷🔶🔶
सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य अंतर्गत सह्याद्री विद्यार्थी अकादमी कर्जत तालुका आयोजित कोरोना सारख्या महामारीला सामोरे जात असताना घरी असणाऱ्यांसाठी एक ऑनलाइन चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती, त्याला कर्जतकरांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला.
स्पर्धेचा निकाल देखील ऑनलाइन पद्धतीने जाहीर केला परंतु कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करणे शक्य झाले नव्हते. या आजाराचा धोका अजूनही पूर्णपणे टळलेला नाही म्हणूनच सर्वांच्या सुरक्षिततेचे सर्व नियम पाळून आपण हा पारितोषिक वितरण समारंभ कमीत कमी लोकांच्या उपस्थितीत पार पाडण्यात आला.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून शिशु मंदिर शाळेच्या मुख्याध्यापिका रेखा गोरे उपस्थित होत्या, त्यांच्या हस्ते विजेत्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी श्रीमती. रेखा गोरे यांनी बालदिन, भारतीय संस्कृती, कोरोना अन दिवाळी या विषयांवर उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच सह्याद्री प्रतिष्ठान व सह्याद्री विद्यार्थी अकादमीचे भरभरून कौतुक देखील केले.
उपस्थितांपैकी वकील वैशाली जगताप, प्रकाश कारेकर, कु. मंदार मुरकुटे व कु. सायली महाडिक यांनी देखील सह्याद्री प्रतिष्ठान व सह्याद्री विद्यार्थी अकादमी यांचे अभिनंदन करून भविष्यात वेळोवेळी संस्थेच्या प्रत्येक कार्यात सहभाग घेण्यासाठी इच्छा व्यक्त केली.

ऑनलाइन चित्रकला स्पर्धेचे विजेते वयोगट 13 वर्षापर्यंत - प्रथम क्रमांक :- कु. प्रतिक अशोक पालवे, द्वितीय क्रमांक :- कु. पियूष तु. घरत, तृतीय क्रमांक :- कु. शर्ली नितीन जगताप, वयोगट 14 ते 21 वर्षे -प्रथम क्रमांक :- कु. अजिंक्य दिपक जंगम, द्वितीय क्रमांक :- कु. संकेत बडेकर, तृतीय क्रमांक :- कु. मनोज नारायण चव्हाण, वयोगट 22 वर्ष व त्या पुढील या गटामध्ये प्रथम क्रमांक :- कु. रुशाल गोपाळ कराळे, द्वितीय क्रमांक :- कु. उमेश महाले, तृतीय क्रमांक :- श्री. प्रकाश कारेकर यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमासाठी शिशु मंदिर शाळेच्या मुख्याध्यापिका रेखा गोरे, सह्याद्री प्रतिष्ठान कर्जत विभाग अध्यक्ष कु. सुधीर साळोखे, उपाध्यक्ष कु. संदेश काळभोर, शहर अध्यक्ष कु. रोहित देशमुख, उपाध्यक्ष रितेश वायकर, कर्जत शहर संपर्क प्रमुख कु. मिथिलेश म्हामूणकर, सह्याद्री विद्यार्थी अकादमी कर्जत विभाग अध्यक्ष कु. स्वप्नाली पाटील, उपाध्यक्ष कु. नंदकुमार तांडेल, सचिव कौस्तुभ पेठे, सदस्य - प्रणव जंगम, हेमलता कांबळे, मयूर मोरे, चेतन फुलावरे, विशाल देशमुख, नीलम चौधरी, हरेश मते, यतीन भोसले, अमोल पानमंद, सागर बोराडे, अक्षय भोईर, मयुरेश कोळी उपस्थित होते.








Be First to Comment