सिटी बेल लाइव्ह । कर्जत । विजय मांडे । 🔶🔶🔷🔷
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून आमदार महेंद्र थोरवे यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात 124 रक्तदात्यांनी रक्तदान करून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कर्जत तालुक्यातील पोसरी येथील सुरभी हॉल मध्ये सार्वजनिक रक्तदाता राजाभाऊ कोठारी यांच्या मार्गदर्शनाखाली समर्पण ब्लड बँक आणि शासकीय रक्तपेढी अलिबाग यांच्या सहकार्याने बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनाचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आमदार महेंद्र थोरवे यांनी बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करून रक्तदान शिबिराचे उदघाटन केले.
याप्रसंगी तालुका प्रमुख उत्तम कोळंबे, उपजिल्हा प्रमुख भाई गायकर, शिवसेना विधानसभा संघटक संतोष भोईर, शिवराम बदे, माजी उपसभापती मनोहर थोरवे, नगरसेवक संकेत भासे, राजाभाऊ कोठारी आदी उपस्थित होते.
जयेश उतेकर यांनी सर्वप्रथम रक्तदान करून रक्तदानाचा शुभारंभ केला. सभापती सुजाता मनवे, नगराध्यक्ष सुवर्णा जोशी, माथेरानच्या नगराध्यक्ष प्रेरणा सावंत, भरत भगत, माजी तालुका प्रमुख संभाजी जगताप, रोहिदास मोरे, प्रथमेश मोरे, सुधाकर देसाई, दिलीप ताम्हाणे, भगवान कांबळे आदींनी शिबिराला भेट दिली. समर्पण रक्तपेढीच्या डॉ. पल्लवी जाधव, स्नेहल कांबळे, नरेश भालेराव, धनश्री लाड, दर्शना उपाध्याय, सोमनाथ गायकवाड, राम नाईक तसेच शासकीय रक्तकेंद्र अलिबागच्या डॉ. दीपक गोसावी, पूनम पाटील, प्रज्ञा पवार, अजय बिडवे, अविशा मालकर, संकेट घरत, उमेश पाटील, महेश घाडगे यांनी रक्त संकलनाचे काम केले.








Be First to Comment