Press "Enter" to skip to content

सक्सेस फॉउंडेशन व एन्जॉय ग्रुपची दिवाळी आदिवासीं सोबत

सिटी बेल लाइव्ह । उरण । विठ्ठल ममताबादे । 🔷🔷🔷🔷

ज्या समाजात आपण जन्मलो त्या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून सामाजिक बांधिलकी जपत सक्सेस फाऊंडेशन व एन्जॉय ग्रुप तर्फे चिरनेर येथील माकडडोरा आदिवासी वाडीवर दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले.

यावेळी सुरज भगत, निलेश ठाकूर, रुपेश पाटील, आनंद म्हात्रे,भेंडखळ गावचे सामाजिक कार्यकर्ते अनिल ठाकूर, अनिल भोईर व संपूर्ण टीम उपस्थित होती. आदिवासी वाडीवरील सर्व आदिवासी आपले सर्व दुःख विसरून या उपक्रमात सहभागी झाले होते. या उपक्रमामुळे आदिवासी व्यक्तींच्या चेहऱ्यावर हास्य उमटले होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.