सिटी बेल लाइव्ह । मुकुंद रांजाणे । माथेरान । 🔷🔷🔶🔶
लॉक डाऊन नंतर माथेरान अन लॉक झाल्यानंतर थोड्याफार प्रमाणात पर्यटकांनी हजेरी लावली असून दीपावलीच्या सणाचे औचित्य साधून माथेरान शिवसेनेचे शहर प्रमुख चंद्रकांत चौधरी यांनी माथेरान मधील नागरिकांना जवळपास एकहजार मिठाईचे बॉक्स वाटप केले आहेत.
यापूर्वी देखील लॉक डाऊन काळात त्यांनी मोफत भोजन व्यवस्था करून गोरगरिबांना एक वेळ जेवणाचा आधार आपल्या मीरा फाउंडेशन मार्फत राबविला होता.भाजीपाला वाटप त्याचप्रमाणें घोड्यांच्या खाद्यासाठी भुसा वाटप केला होता. तसेच जीवनावश्यक वस्तूंचे सुध्दा लॉक डाऊन काळात वाटप केले होते.
मीरा फाउंडेशनच्या उपाध्यक्षा रेखा चौधरी यांनी आपल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना सोबत घेऊन प्रत्येक घरोघरी मिठाईचे वाटप करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे प्रसिद्धी प्रमुख अमोल चौगुले यांसह अन्य कार्यकर्ते मोठया संख्येने सहभागी झाले होते.
सध्यातरी शिवसेनेचे कार्यकर्ते आणि प्रमुख नेतेमंडळी यांनी लॉक डाऊन काळात इथल्या नागरिकांना अनेक जीवनावश्यक साहित्य वाटप करून सात महिन्याच्या कार्यकाळात मोठा हातभार लावला होता त्यामुळे सर्वच स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.








Be First to Comment