Press "Enter" to skip to content

पालीकरांच्या मनात बिबट्याची भीती !

पाली वाघजाई लोकवस्तीच्या नगरात एका गुरख्यास बिबट्या दिसला ? नागरिकांना वनविभागाचे खबरदारी घेण्याचे आवाहन 🔷🔷🔶🔶

सिटी बेल लाइव्ह । पाली/बेणसे । धम्मशील सावंत । 🔷🔷🔷🔷

सुधागड तालुक्यातील काही भागात बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे. नागशेत , कुसुंबळे परिसरात बिबट्या दिसून आला होता. त्यानंतर आता लोकवस्ती असलेल्या पाली वाघजाई नगर येथे एका गुराख्यास बुधवारी (दि.18) सायंकाळी बिबट्या दिसला असल्याचे त्याने वनविभागाला सांगितले.

वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी याबाबत त्यांच्याकडून माहिती घेतली आहे. तसेच त्यांनी काढलेल्या पंजाच्या फोटो सुस्पष्ट नाही. वन खात्यामार्फत याची सत्यता पडताळली जात आहे. मात्र यामुळे पालीकरांच्या मनात बिबट्याची चांगलीच भीती निर्माण झाली आहे.

बिबट्याच्या पंज्याचे अस्पष्ट छायाचित्र.

सुधागड वनक्षेत्रपाल समीर शिंदे यांनी बोलताना सांगितले की सुधागड तालुक्याची भौगोलिक रचना डोंगर दर्याखोऱ्या, घनदाट व तुरळक जंगल, माळरान पठार अशी आहे, जैवविविधतेसाठी पोषक वातावरण याठिकाणी आहे. त्यामुळे वन्यजीव प्राण्यांचा मुक्त संचार जंगलभागात दिसून येतो. 40 स्क्वेअर की.मी क्षेत्रात बिबट्या चा संचार असतो, बिबट्या प्रवनक्षेत्रात नागरिकांनी जाणे टाळावे, नागरिकांनी स्वतःची, कुटुंबाची व गुरांची काळजी घ्यावी असे आवाहन वनक्षेत्रपाल समीर शिंदे यांनी केले.

कोणीही घाबरून जाऊ नये. अफवांना बळी पडू नका. रात्री घराचे दारे खिडक्या लावून झोपावे. रात्री बाहेर पडू नये, लहान मुलांना बाहेर सोडू नका व आपली गुरेढोरे गोठ्यात बांधून ठेवा. वनविभागाचे कर्मचारी सकाळी पुन्हा स्पॉटवर जाऊन पाहणी करणार आहेत. अशी माहिती पाली-सुधागड वनक्षेत्रपाल
समीर शिंदे यांनी दिली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.