Press "Enter" to skip to content

चौक येथे बडबड गीत व बालगीत स्पर्धेचे आयोजन 

सिटी बेल लाइव्ह । खालापूर । बातमीदार । 🔷🔷🔷🔷

शालेय विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन मराठी बडबड गीत व बालगीत स्पर्धेचे आयोजन चौक कोमपास रायगङ उत्तर तर्फे करण्यात आले आहे.

कोरोनामुळे पहिली ते दुसरीतील बालकांसाठी बालदिना निमित्ताने   कोमपासच्या रायगड जिल्ह्यातील उत्तर मधील खालापूर , कर्जत, उरण, पेण, सुधागड पाली तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी चौक येथे ऑनलाइन मराठी बडबड गीत व  बालगीत स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

स्पर्धकांनी मराठी भाषेतीलच बडबङ गीत व बालगीत सादर करायचे आहे.फक्त चिञफित प्रवेशिकासह स्पर्धा प्रमुख यांच्या कडे 24 नोव्हेंबर 2020 पर्यंत पाठवायची आहे. या स्पर्धेकरीता विनामूल्य प्रवेश असणार आहे.  गाण्याचे सादरीकरण, हावभाव, वेषभूषा आदिनुसार परिक्षण  होणार असून परीक्षकांचा निर्णय अंतिम असेल. चिञफित सलग असावी व जास्तीत जास्त तीन मिनिटांची असावी काटछाट करून  नये असे आयोजकानी सांगितले आहे.

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी  भूषण पिंगळे यांच्याशी 9326667459 संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.